युतीचे ठरले  : शिवसेना विधानसभेच्या १६६ जागा  लढवणार ?

उद्धव ठाकरे यांनी मुंबईच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची दुपारी12 वाजता मातोश्रीवर बैठक बोलवली आहे . मुंबईतील सर्व विभागप्रमुख आणि आमदार उपस्थित राहणारआहेत. युतीबाबत शिवसेना पक्षान्तर्गत हालचालींना वेग आला आहे .
Thakre- shah
Thakre- shah

 उद्धव ठाकरे अमित शाह आज  युतीची घोषणा करणार  

मुंबई : शिवसेना-भाजप युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज संध्याकाळी मातोश्रीवर येणार आहेत. यावेळी ते शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा करणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपांवर दोन्ही पक्षांचे प्रमुख अंतीम शिक्कामोर्तब करतील. 

त्यानंतर शिवसेना आणि भाजपची संयुक्त पत्रकार परीषद होणार आहे. या पत्रकार परीषदेत शिवसेनेनं त्यांच्या अटी आणि शर्थीं सविस्तर सांगण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत युती विरुद्ध आघाडी असाच थेट सामना होणार आहे. मात्र मतदार राजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकणार हे निकालाच्या दिवशीच स्पष्टं होईल. युतीसाठी काय आहेत शिवसेनेच्या अटी आणि शर्थी काय आहेत याबाबतचा तपशील असा , 


 लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदार संघ देणार. त्यामुळे महाराष्ट्रातील ४८ पैकी शिवसेना २३ तर भाजप २५ जागांवर उमेदवार उभे करणार.

 विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी  शिवसेना १४४ आणि भाजप १४४ असा फिफ्टी-फिफ्टी फाॅर्मुला असणार.

 शिवसेनेनं ही युती फक्तं भाजपशी केलेली आहे. भाजपच्या मित्र पक्षांशी नाही.

 त्यामुळे भाजपच्या १४४ जागांपैकी त्यांना मित्र पक्षांसाठी किमान २० जागा सोडाव्या लागतील.

 भाजपच्या मित्र पक्षांच्या जागेवर शिवसेना त्यांचे उमेदवार उभे करणार.

 त्यामुळे विधानसभेत शिवसेना १६४ पर्यंत उमेदवार उभे करू शकते.

 युतीतील जागावाटपां बरोबरच राज्यातील शेतकर्यांच्या प्रश्नांवरही शिवसेनेनं आग्रही भूमिका ठेवली आहे. युती करताना ही प्रमुख अट ही ठेवण्यात आली होती.

शेतकर्यांना १००% कर्जमूक्ती, त्यांच्या उत्पादीत पीकांना हमीभाव आणि दुष्काळग्रस्तं गावांत तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करणे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com