Shivsena leaders discuss political scenario at Matoshree | Sarkarnama

शिवसेना नेत्यांची मातोश्रीवरील बैठकीत राजकीय खलबते  

सरकारनामा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर विस्तृत चर्चा करतो आहे. शिवसेनेच्या वार्षिक दसरा मेळाव्याला किमान 5 लाख नागरिक यायला हवेत असे लक्ष्य ठरविण्यात आले आहे .

मुंबई  : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास अभूतपूर्व गर्दी कशी होईल ? मंत्री मंडळ विस्तारात सहभागी व्हायचे किंवा नाही ? झाल्यास चांगली खाती मागायची का ? अशा विविध प्रश्नावर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना नेत्यांची राजकीय खलबते झाली असल्याचे समजते 

 दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर विस्तृत चर्चा करतो आहे. शिवसेनेच्या वार्षिक दसरा मेळाव्याला किमान 5 लाख नागरिक यायला हवेत असे लक्ष्य या आधीच निश्‍चित झाले असताना आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रमुख नेत्यांशी सविस्तर चर्चा केली.

मातोश्रीवर झालेल्या या बैठकीला विधिमंडळघतील पक्षनेते सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे, संजय राउत, रामदास कदम, सुभाष देसाई उपस्थित होते. राज्याच्या विविध भागात सेनेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा तसेच स्थानीय समीकरणांचा यावेळी आढावा घेण्यात आला.

 मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी व्हायचे   किंवा नाही ?  तीन भाजपशासीत राज्यात घोषित झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल काय असेल यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते. मुंबईतून मेळाव्याला किती सैनिक येतील, मेळाव्याच्या तयारीसाठी काय करण्यात यावे याबददल मते मांडतानाच पुणे, नाशिक या सेनेच्या बालेकिल्ल्यातून कार्यकर्ते येतील अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात येते आहे. 

मंत्रिमंडळातील समावेशाबाबत काही काळाने विचार करण्यात येईल, मात्र काही महत्वाची खाती मागण्याचा विचार शिवसेनेत सुरू आहे. पक्षातील काही नेत्यांना मात्र भाजप आपल्याला आगामी निवडणुकीच्या आधी काय देणार याचा तपशील आताच मागून घेतला पाहिजे असे मत नोंदवत आहेत.

मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्तारात आपल्याला स्थान मिळावे यासाठी आमदारांनी आडून प्रयत्न सुरू केले आहेत. दिल्लीतील नेते तसेच संघ परिवारातील धुरीणांनी आपल्या नावाची शिफारस केली तर त्याचा लाभ होईल या भावनेतून प्रयत्न सुरू झाले आहेत. 
 

संबंधित लेख