Shivsena leader Diwakar Ravte targets BJP | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

भाजप हे गुंडांचे 'सुधारगृह' आहे काय? - दिवाकर रावते 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

नागपूर   : " कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांना प्रवेश देण्यापूर्वी भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये झालेल्या अनेक खून प्रकरणांवर सफाई द्यावी.  गुंड व खुन्यांना पावन करून घेणारे भाजप सुधारगृह झाले आहे काय?," असे परखड बोल शिवसेना नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी भाजपला सुनावले. 

शिवसेनेच्या विभागीय मेळाव्यासाठी रावते आज यवतमाळ येथे आले होते. यावेळी बोलताना त्यांनी भाजपमध्ये सुरु असलेल्या "इनकमिंग'वर चांगलीच फटकेबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

यावर बोलताना ते म्हणाले, "मुख्यमंत्री फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये बोलताना या भागात झालेल्या विविध राजकीय खुनांचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी केली होती. आता मुख्यमंत्र्यांनी आपल्या शब्दावर ठाम राहिले पाहिजे. सिंधुदुर्गमधील नेत्यांना भाजपात पावन करून घेण्यापूर्वी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या खुनाची माहितीही जनतेला आधी करून द्यावी ."

"भाजपात आता कुणालाही प्रवेश दिला जात आहे .  गुंड, खुनी लोकांना प्रवेश देऊन त्यांचा वाल्याचा "वाल्मिकी' करण्याचा विडा भाजपने उचलला आहे, असे भाजप नेते बोलतात. भाजप हे सुधारगृह झाले काय?", असा सवाल रावते यांनी केला. 

संबंधित लेख