shivsena leader and satej patil | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

"सतेज' कृषी प्रदर्शनातील शिवसेना नेत्यांच्या आजच्या संभाव्य उपस्थितीबद्दल उत्सुकता

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कोल्हापूर : कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती चर्चेची ठरली असतानाच आज सांगता समारंभासाठी जिल्ह्यातील शिवसेनेचे सहाही आमदार तसेच शिवसेना सहसंपर्कप्रमुख व कोल्हापूर लोकसभेसाठी शिवसेनेचे संभाव्य उमेदवार प्रा.संजय मंडलिक यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. या कार्यक्रमाला खासदार राजू शेटटी आणि म्हाडचे अध्यक्ष समरजिसिंह घाटगे हे देखील उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमात होणाऱ्या टोलेबाजीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

आमदार पाटील यांनी तपोवन मैदानात 28 ते 31 डिसेंबर या कालावधीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक मान्यवर उपस्थित होते. तर रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी या प्रदर्शनास भेट दिली. यापूर्वीच पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनखाली भाजपकडून नवदुर्गा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार सतेज पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांसह भेट दिली होती, याची परतफेड मंत्री पाटील यांनी कृषी प्रदर्शनाला भेट देवून केली. 

आता मात्र चर्चा सुरु आहे ती आज होणाऱ्या सांगता समारंभाची. या कार्यक्रमाला खासदार राजू शेटटी व म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांची उपस्थिती राहणार आहे. खा.शेटटी आणि आमदार पाटील यांची अलिकडच्या वर्षभरात चांगलीच गटटी जमली आहे. समरजितसिंह घाटगे यांचे व आमदार पाटील यांचेही संबंध चांगले आहेत. मात्र या सांगता समारंभाला शिवसेनेचे जिल्ह्यातील सहाही आमदार आणि सहसंपर्कप्रमुख प्रा.संजय मंडलिक उपस्थित राहणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेच्या जागेवर आमदार सतेज पाटील यांनी दावा सांगत ही जागा कॉंग्रेसला मागितली होती. सध्या या जागेवर आमदार पाटील यांचे कटटर विरोधक, राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक हे प्रतिनिधीत्व करत आहेत. मात्र राष्ट्रवादीने ही जागा कॉंग्रेसला देण्यास नकार दिल्याने आमदार पाटील काय भूमिका घेणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कृषी प्रदर्शनाच्या सांगता समारंभाला शिवसेना आमदारांची फौज आणि संभाव्या उमेदवारांना निमंत्रीत करुन आमदार पाटील आपली "वाटचाल' तर स्पष्ट करत नाहीत ना, असा प्रश्‍न जिल्ह्यातील जनतेला पडला आहे. 

संबंधित लेख