shivsena leader | Sarkarnama

राधाकृष्ण विखे भाजपचे  बोलके बाहुले : कायंदे 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 मे 2017

मुंबई : राज्याचे अस्तित्वहीन विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे सत्ताधारी भाजपचे बोलके बाहुले असल्याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. शेतकऱ्यांचा संप फोड़ण्याचा प्रयत्न त्यांनी केला. मात्र , ते तोंडघशी पड़ले अशी टीका शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ.मनीषा कायंदे यांनी आज केली. 

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची विखे यांनी आज खिल्ली उडविली आहे. मात्र शिवसेनेचे अभियान शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांनी शिवसेनेवर केलेली टीकाही बालीश आहेच. शिवाय भाजपची चापलूसी करण्यात ते दंग आहेत. महाराष्ट्राने असा विरोधीपक्षनेता यापूर्वी कधीही पाहिला नाही याकडेही कायंदे यांनी लक्ष वेधले. 
 
संबंधित लेख