shivsena kavad yatra | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

शिवसेनेची कावड यात्रा यंदा आपलाच विक्रम मोडणार

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : श्रावण महिन्यात गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने विश्‍वविक्रमी 151 फूट कावड यात्रा काढण्यात आली होती. यंदा शिवसेना आपलाच विक्रम मोडण्याच्या तयारीत असून यावर्षी 1 सप्टेंबर रोजी तब्बल 501 फुटांची कावड घेऊन ही यात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व सह संयोजक दयाराम बसैय्ये यांच्या संकल्पनेतून यंदा कावड यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. हर्सुल येथील हरसिध्दी माता मंदीर येथून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरूवात होईल.

औरंगाबाद : श्रावण महिन्यात गेल्या वर्षी शिवसेनेच्या वतीने विश्‍वविक्रमी 151 फूट कावड यात्रा काढण्यात आली होती. यंदा शिवसेना आपलाच विक्रम मोडण्याच्या तयारीत असून यावर्षी 1 सप्टेंबर रोजी तब्बल 501 फुटांची कावड घेऊन ही यात्रा काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व सह संयोजक दयाराम बसैय्ये यांच्या संकल्पनेतून यंदा कावड यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. हर्सुल येथील हरसिध्दी माता मंदीर येथून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरूवात होईल. येथील कुंडातील जलकलश घेऊन टीव्ही सेंटर, गणेश कॉलनी, चेलीपूरा, गांधी पुतळा, सराफा, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, संभाजीपेठ, नागेश्‍वरवाडी मार्गे खडकेश्‍वर येथील महादेव मंदिरात ही कावड यात्रा पोहचेल. 

कावड यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे यासाठी एका विशेष रथाद्वारे आवाहन करण्यात येते असून शहरातील 58 महादेव मंदिरात हा रथ जाणार आहे. या रथ यात्रे सोबत कावड घेऊन सहभागी झालेल्या शिवभक्तांचे ठिकठिकाणी पूजन देखील करण्यात येत आहे. गेल्यावर्षी 151 फुटांची कावड घेऊन ही यात्रा मोठ्या संख्येने निघाली होती. विशेष म्हणजे याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डने घेतली होती. यावेळी आयोजकांनी 501 फुटांची कावड तयार करण्याचा संकल्प केला आहे. 
 

टॅग्स

संबंधित लेख