तुकाराम मुंढेच्या विरोधात आततायीपणाने शिवसेना पडली एकाकी 

महापालिका आयुक्तांची कडक शिस्त व नियमानुसार कामाचा कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्रास होतो. मात्र त्यावर बोलणार कोण? हे नेहेमीच अनुत्तरीत असे. दोन आठवड्यापूर्वी सहाय्यक अधीक्षक धारणकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा संबंध कामाच्या ताणाशी जोडला गेला. त्यावर शिवसेना प्रणीत म्युनिसीपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष नगरसेवक बंटी तिदमे यांनी आयुक्त मुंढे यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला.
Shivsena Tiger and Tukaram Mundhe
Shivsena Tiger and Tukaram Mundhe

नाशिक : कर्मचारी संप ही गंभीर कृती असते. मात्र, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात सातत्याने राजकीय भूमिकेतून पावले टाकणाऱ्या नेत्यांनी संपाचाही वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवसेना नेत्यांच्या आततायीपणाने एक पाऊल पुढे टाकण्याआधीच या संघटनांत फूट पडली आहे. त्यामुळे तुकाराम मुंढेच्या विरोधात शिवसेना एकाकी पडल्याचे चित्र आहे. 

महापालिका आयुक्तांची कडक शिस्त व नियमानुसार कामाचा कर्मचारी, अधिकाऱ्यांना त्रास होतो. मात्र त्यावर बोलणार कोण? हे नेहेमीच अनुत्तरीत असे. दोन आठवड्यापूर्वी सहाय्यक अधीक्षक धारणकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याचा संबंध कामाच्या ताणाशी जोडला गेला. त्यावर शिवसेना प्रणीत म्युनिसीपल कर्मचारी, कामगार सेनेचे अध्यक्ष नगरसेवक बंटी तिदमे यांनी आयुक्त मुंढे यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला. त्यासाठी कर्मचारी सेनेसह, सीटू प्रणीत संघटना, समता कर्मचारी संघटना, घंटागाडी कामगारांची श्रमिक संघ आदींची द्वारसभा झाली. त्यात संयुक्त कृती समिती स्थापन करण्याचे ठरले. नगरसेवक तिदमे यांनी उत्साहात महापालिका आयुक्त मुंढे यांना लक्ष्य करीत संपाची घोषणाही केली. 

या द्वारसभेनंतर नेत्यांची बैठक, विचारविनिमय न करताच शिवसेनेने परस्पर चौदा दिवसांचा अवधी देऊन महापालिका प्रशासनाला संपाची नोटीस दिली. संपासारख्या गंभीर विषयावर कोणालाही विश्‍वासात न घेताच शिवसेनेने परस्पर नोटीस दिल्याने अन्य संघटनांनी मात्र त्यापासून लांब राहण्याचा निर्णय केला. त्यामुळे एक पाऊल पुढे टाकण्याआधीच आयुक्त मुंढेंना विरोधासाठी एकत्र आलेल्यांमध्ये फुट पडली आहे. संप ही खुप मोठी कृती आहे. त्याचा गांभीर्याने विचार करुन निर्मय घ्यावा लागतो. संपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्याची जबाबदारी कोणावर हे निश्‍चित करावे लागते. मात्र, केवळ राजकीय दृष्टीकोण घेऊन विरोधासाठी अतीउत्साहामुळे शिवसेनेने त्यावर पाणी फिरवल्याची चर्चा आहे. 

संप ही खुप गंभीर कृती आहे. पुरेसा विचारविनिमय व कृती समितीच्या बैठकीत त्यावर चर्चा अपेक्षीत असते. तसे काहीच घढलेले नसल्याने आम्ही त्यातुन बाहेर पडलो आहोत. - डॉ. डी. एल. कराड, नेते, सीटू संघटना 

आयुक्त तुकाराम मुंढेच्या कार्यपध्दतीला कर्मचारी कंटाळले आहेत. त्रस्त कर्मचाऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे चौदा दिवस आधी कर्मचारी संपाची नोटीस दिली आहे. त्यावर आम्ही ठाम आहोत. - बंटी तिदमे, अध्यक्ष, म्युनिसीपल कर्मचारी, कामगार सेना 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com