लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला पालघरमध्ये झटका! राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला पालघरमध्ये झटका! राष्ट्रवादीकडे नगराध्यक्षपद

पालघर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या पालघर नगरपरिषद निवडणुकीमध्ये सेना- भाजपच वर्चस्व असलं तरी नगराध्यक्ष पदावर महाआघाडीच्या ( राष्ट्रवादी) उज्वला काळे यांचा 1069 मतांनी विजय झाला आहे.

पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं, मात्र नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचा उमेदवार विराजमान होणार आहे. थेट जनतेतून राष्ट्रवादीच्या उज्ज्वला काळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या.

पालघर नगरपरिषदेसाठी 14 प्रभागांमधील 28 जागा आणि एक नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक झाली असून यात शिवसेना 14 , भाजप 7 ( महायुती- 21) अपक्ष 5 आणी राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचा विजय झाला आहे.

सेना -भाजप चे सर्वात जास्त म्हणजे 21 उमेदवार निवडून आले असले तरी त्यांना नगराध्यक्ष पदाला मुकावे लागले आहे.युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सेनेच्या श्वेता पाटील यांना 12904 मत मिळाली तर  उज्वला काळे यांना 13974 मिळाली. काळे यांनी श्वेता पाटील यांचा 1069 मतांनी पराभव केला.

पालघर नगरपरिषद हा सेनेचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला असून यावेळी सेनेने राष्ट्रवादीतुन आयात केलेल्या श्वेता पाटील यांना उमेदवारी दिल्याने सेनेच्या 14 उमेदवारांनी बंडखोरी केली याचा मोठा फटका बसला. पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com