shivsena gandhigiri | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

करवाढीच्या मुद्यावर अकोल्यात शिवसेनेची "गांधीगिरी '

सरकारनामा ब्युरो
रविवार, 20 ऑगस्ट 2017

अकोला : महापालिकेतील सत्ताधारी भाजपने केलेल्या करवाढीला विरोध करण्यासाठी शिवसेनेच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शनिवारी महापालिकेसमोर गोंधळी आंदोलन केले. विशेष म्हणजे अकोलेकरांवर अवाजवी करवाढ लादून सर्वसामान्य नागरिकांना "अच्छे दिन' दाखविल्याची टिका करीत महापौर विजय अग्रवाल यांची आरती ओवाळत गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी केली. 

अकोला महापालिकेच्या करवाढीचा मुद्दा पेटला असून आज झालेल्या सर्वसाधारण सभेत याच मुद्यावर सत्ताधारी भाजप विरुद्ध विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, भारिप-बमसं, राष्ट्रवादी कॉंग्रेसला असा सामना रंगला. काल भारिप-बमसं, कॉंग्रेसने केलेल्या आंदोलनानंतर शिवसेनेही महापालिकेसमोर गोंधळी आंदोलन केले. त्यानंतर शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा, नगरसेवक मंगेश काळे, शशी चोपडे, गजानन चव्हाण, मंजुषा शेळके, महानगराध्यक्ष अतुल पवनीकर, शहर संघटन तरूण बगेरे, अश्विन नवले, उपशहर प्रमुख केदार खरे, बबलु उके, मनोज बाविस्कर, विशाल शिंदे आदी पदाधिकारी व शिवसैनिकांनी महापौर विजय अग्रवाल यांच्या कक्षात जाऊन त्यांची आरती ओवाळत त्यांना गुलाब पुष्प देऊन अकोलेककरांवर अवाजवी कर लादल्याबद्दल सत्कार करीत गांधीगिरी केली. शिवसेनेच्या या आंदोलनाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

संबंधित लेख