शिवसेना उपनेते अनिल राठोड यांना नगरसह पाच जिल्ह्यातून हद्दपारीची नोटीस

शिवसेना वर्तुळात ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याची चर्चा आहे .
anil Rathod mla ss
anil Rathod mla ss

नगर :  कायदा व सुव्यवस्था आबादीत रहावी म्हणून, शिवसेनेेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांना नगरसह पाच जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार का करण्यात येवू नये, अशी नोटीस प्रांताधिकाऱ्यांनी बजावली आहे. त्यांचे म्हणणे एकूण घेतल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे.


नगर महापालिका निवडणुकीत शिवसेना माजी आमदार अनिल राठोड आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र मतभेद झालेले होते . भाजपच्या काही मंत्र्यांना देखील माजी आमदार राठोड यांनी निवडणुकीच्या काळात दुखावले होते . शिवसेना वर्तुळात ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने होत असल्याची चर्चा आहे . 

केडगाव पोटनिवडणुकीनंतर झालेले दुहेरी हत्याकांडाने राज्यभर खळबळ उडाली होती. त्या पार्श्वभूमीवर राठोड यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या सर्वांचा आढावा घेवून ही कारवाई करण्यात आली आहे. 

प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही नोटीस बजावली आहे. त्यामध्ये नगरसह बीड, आैरंगाबाद, नाशिक व पुणे या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार का करू नये, असे म्हटले आहे. ता. २६ पर्य़ंत त्यांना म्हणणे सादर करण्यास मुदत दिली आहे. त्यानंतर याबाबत कारवाई करण्यात येणार आहे. 

दरम्यान, नोटीस देण्याची कुणकुण लागताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मागील महिन्यात विरोधकांवर आरोप केले होते. आता नोटीसच प्राप्त झाल्याने याबाबत शिवसेनेचे नेते काय भूमिका घेतात, याकडे प्रशासनाचे लक्ष आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com