Shivsena Ex Minister Babanrao Gholap Cheated | Sarkarnama

'व्हीआयपी नंबर'चा हव्यास नडला - बबनराव घोलपांना लाखांचा गंडा

संपत देवगिरे 
मंगळवार, 6 मार्च 2018

सामान्य नागरिकांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार नेहेमीच कानावर येतात. त्यात किती जणांना दाद मिळाली, किती लोकांना न्याय मिळाला हे कधीच लोकांपुढे येत नाही. आता मात्र माजी मंत्री व शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेतेच या जाळ्यात अडकले. मोबाईलचा व्हीआयपी क्रमांक आणि आयफोन देण्याचे आमिष दाखवुन शिवसेना नेते माजी मंत्री बबन घोलप यांना जयपुरच्या भामट्यांनी लाखांचा गंडा घातला आहे.

नाशिक : सामान्य नागरिकांची ऑनलाईन व्यवहारात फसवणूक होण्याचे प्रकार नेहेमीच कानावर येतात. त्यात किती जणांना दाद मिळाली, किती लोकांना न्याय मिळाला हे कधीच लोकांपुढे येत नाही. आता मात्र माजी मंत्री व शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेतेच या जाळ्यात अडकले. मोबाईलचा व्हीआयपी क्रमांक आणि आयफोन देण्याचे आमिष दाखवुन शिवसेना नेते माजी मंत्री बबन घोलप यांना जयपुरच्या भामट्यांनी लाखांचा गंडा घातला आहे. याबाबत फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने घोलप यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. 

माजी सामाजिक न्यायमंत्री तसेच शिवसेना नेते बबन घोलप यांनी नाशिक रोड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर भारती एअरटेल कंपनीचे व्यवस्थापक असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचा फोन आला. त्यात तुम्हाला 8444444444 हा व्हीआयपी क्रमांक व त्यासोबत आयफोन एक्‍स हा नवीन मोबाईल संच देणार आहोत, असे त्या व्यक्तीने सांगितले. त्यासाठी त्यांनी 1.33 लाख रुपये भरण्यास सांगितले.

घोलप यांनी कल्वार रोड, जयपुर, वैशाली नगर जयपुर येथील तीन बॅंक खात्यात आरटीजीएस द्वारे 1.33 लाख रुपये जमा केले. नाशिकचा पत्ता असलेल्या कार्यालयात संपर्क करण्यास सांगितले. मात्र त्या पत्त्यावर कार्यालयच नव्हते. प्रत्यक्षात ज्या क्रमांकावरुन फोन आले होते. त्या 7400270655, 8097107089 आणि 9022974444 या क्रमांकावरुन काहीही उत्तर मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी पोलिसांत फसवणुक झाल्याची तक्रार नोंदवली आहे. यासंदर्भात पोलिसांनी सायबर क्राईम ब्रॅंचच्या मदतीने तपास सुरु केला आहे.

संबंधित लेख