shivsena election, mumbai | Sarkarnama

 मध्यावधीच्या शक्‍यतेने शिवसेना "सावध" 

ब्रह्मा चट्टे 
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई : राज्यात सध्या मध्यावधीच्या चर्चेचे वारे जोरात सुरू आहे. भारतीय जनता पक्षाकडून मध्यवधीच्या सुरू असलेल्या हालचाली पाहून शिवसेनेही सावध होत पावले उचलण्यास सुरवात केली आहे. त्यामुळेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पर्व विदर्भाची दौरा संपवून मराठवाड्याकडे कुच केल्याचे समजते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मध्यवधीच्या शक्‍यतेने पक्षाच्या शिलेदारांच्या तयारीची चाचपणी करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

राज्याच्या इतिहास सर्वाधिक कर्जमाफी म्हणत भाजपने श्रेयवादात उडी घेतल्यानंतर शिवसेनाही चांगलीच आक्रमक झाली आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कर्जमाफीच्या निर्णयानंतर पुणतांबे गावसह मराठवाड्याचा दौरा सुरू आहे. या दौऱ्यात वेळेवेळी शिवसेना शेतकऱ्यांच्या बाजू असल्यानेच कर्जमाफीचा निर्णय झाला असल्याचा दावा केला जात आहे. 

भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी बॅंनर लावून कर्जमाफीच्या मुद्द्यावर श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवल्याचे लक्षात आल्याने शिवसेना सरसावली आहे. भाजपकडून मध्यवधीला सामोरे जाण्याची तयारी चालवली असल्याचे लक्षात येताच शिवसेनेकडूनही जोरात हलचाली सुरू झाल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात "हिम्मत असेल तर मध्यावधी घ्याच" असे भाजपला आव्हान दिले होते. त्यानंतर भाजपच्या गोटातही याबाबत चांगलेच खलबते झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 

शेतकरी आंदोलन काळातील गुन्हे मागे घेण्याचा वादही आता वाढण्याची लक्षणे दिसत आहेत. शिवसेनेकडून गुन्हे मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेनेने शेतकऱ्यांना गुन्हेगार ठरवत असाल तर शिवसेना गुन्हेगारांबरोबर असल्याचा इशाराही सरकारला दिला आहे. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाडा दौऱ्याच शिवसेनेचे सर्वप्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

या दौऱ्यात संभाव्य परिस्थिती लक्षात घेता शिवसेनेची त्या त्या मतदार संघात काय रणनिती असेल याचीही चाचपणी केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. भाजपची राज्यातील प्रचाराचा जोर पहाता शिवसेनेही येणाऱ्या संभाव्य परिस्थीतीचा अंदाज घेत " सावध" पणे हालचाली सुरू केल्या असून मध्यवधीच्या शक्‍यतेवरून सरकारवरही दबाव बनवण्याचा प्रयत्नात सेना असल्याचे समजते. 

संबंधित लेख