shivsena donation no 1 | Sarkarnama

"मनी'भाईचे वजन वाढले, शिवसेनेला सर्वाधिक देणग्या 

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

कोलकता : राजकारणातील "मनी'भाईचे वजन दिवसेंदिवस वाढत चालले असून, राष्ट्रीय पक्षांप्रमाणेच प्रादेशिक पक्षही देणग्या घेण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. शिवसेनेला 2016- 17 मध्ये 297 देणग्यांच्या माध्यमातून 25 कोटी 65 लाख रुपये मिळाले असून, त्यानंतर आम आदमी पक्षाचा (आप) क्रमांक लागतो. 

"आप'ला 3 हजार 865 देणग्यांच्या माध्यमातून 24 कोटी 73 लाख रुपये मिळाले आहेत. शिरोमणी अकाली दल या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असून, या पक्षाला देणगी रूपाने 15 कोटी 45 लाख रुपये मिळाले आहेत. 
प्रादेशिक पक्षांना देणग्यांच्या रूपाने मिळालेल्या एकूण रकमेतील 72.05 टक्के म्हणजे जवळपास 65 कोटी 83 लाख एवढी रक्कम तीन आघाडीच्या पक्षांच्या झोळीत पडली आहे. 

"असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स' (एडीआर) या संस्थेने हा अभ्यास अहवाल तयार केला असून, यामध्ये प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांचा आढावा घेण्यात आला आहे. या सर्व पक्षांनी त्यांना मिळालेल्या 2016- 17 मधील देणग्यांचा तपशील निवडणूक आयोगाला सादर केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख