Shivsena delegation urges C.M. to withdraw cases against farmers | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

कर्जमाफी आंदोलनातील सहभागी शेतकऱयांवरील  गुन्हे मागे घ्या - शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

सिद्धेश्‍वर डुकरे :  सकाळ न्यूज नेटवर्क 
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

मुंबई   : शेतकरी कर्जमाफी विरोधात राज्यातील शेतकऱयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.या शेतकरी आंदोलकावर कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न करून पोलिसांनी गुन्हे दाखल केले. मात्र हे गुन्हे राजकीय स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे सरकारने मागे घ्यावेत,यासाठी शिवसेनेचे मंत्री आमदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱयांनी त्यांना कर्जमाफी मिळण्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने केली आहेत. त्यामुळे त्यांच्या विरूद्ध विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यत आले आहेत. शेतकरी कर्जमाफीसाठीचे आंदोलन तिव्र झाल्याने सरकारला नमते घ्यावे लागले.यानंतर सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 जाहीर करण्यात आली.त्यामुळे आंदोलना दरम्यान शेतकर्यावर दाखल झालेले  गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी शिवसेनेचे मंत्री दादा भुसे,आमदार सुनील प्रभू आदींच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.

संबंधित लेख