shivsena dasara mela | Sarkarnama

दसरा मेळाव्याची जबाबदारी शिवसेनेच्या "एक'नाथावर 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

ठाणे : शिवसेना नेतृत्त्वाने यंदाच्या दसरा मेळव्याची जबाबदारी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर दिली आहे. त्यामूळे हा मेळावा शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱयांसाठी अधिकच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. 

ठाणे : शिवसेना नेतृत्त्वाने यंदाच्या दसरा मेळव्याची जबाबदारी शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या खाद्यांवर दिली आहे. त्यामूळे हा मेळावा शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱयांसाठी अधिकच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. 

दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेच्या शक्ती प्रदर्शनाचे हक्काचे व्यासपीठ. राज्यभरातून या मेळाव्याला शिवसैनिक उपस्थित राहत असल्याने लाखभरचा गर्दी म्हणजे या मेळव्यासाठी अप्रुप राहिलेले नाही. पण शिवसेनेच्या परंपरेनुसार या मेळव्याची जबाबदारी प्रामुख्याने शिवसेनेच्या मुंबईतील पदाधिकाऱयावर देण्याचे संकेत होते. पण 
शिवसेनेतील सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकटया ठाणे जिल्ह्यातून सुमारे दोन हजार बसेस मेळाव्यासाठी दादर येथील शिवाजी पार्ककडे रवान करण्यात येणार आहेत. 

डिसेंबरनंतर येणाऱ्या लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी शिवसेनेची राज्यातील ताकद अद्याप कायम असल्याचे सिद्ध करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी व्यूहरचना आखली आहे. त्यामूळेच यंदाच्या मेळाव्यासाठी किमान पाच लाखांची गर्दी होईल या दष्टीने शिवसेनेच्या वतीने आखणी केली जात आहे. विशेष म्हणजे या पाच लाखात किमान एक लाख शिवसैनिक ठाणे जिल्हयातून जातील अशी तजवीज केली जात आहे. 

त्यासाठी आतापर्यंत किमान दोन हजार बसेस बुक करण्यात आल्या आहेत. त्यासाठी स्थानिक पातळीवरील नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी देऊन एकनाथ शिंदे स्वस्थ बसलेले नसून दररोज सायंकाळी कोणा पदाधिकाकडून किती बसेस बुक केल्या गेल्या, तसेच शिवसैनिकांसाठी त्या दिवशी काय सुविधा उपलब्ध करुन देणार याची माहिती घेत आहेत. त्यामूळे दरवर्षी पेक्षा यंदा जास्त उत्सहाने ठाण्यातील शिवसैनिक दसरा मेळाव्याच्या तयारीला लागलेले आहेत. 
 

संबंधित लेख