shivsena dasara mela | Sarkarnama

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेच्या जोर बैठका 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशात असल्याने दसरा मेळाव्याच्या तयारीची जबाबदारी संसदेतील पक्षनेते संजय राउत यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आज मराठवाडा तसेच मुंबईलगतच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांशी राउत यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत चर्चा केली. 

दसरा मेळावा भव्य व्हावा यासाठी जोरात तयारी सुरू आहे. या मेळाव्याला विक्रमी उपस्थिती असावी, सेनेच्या आगामी वाटचालीचे सूत्र काय असावे याबददल मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे. 

दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी मराठवाडा तसेच खानदेशातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी राज्यभर कामाला लागणे आवश्‍यक असल्याचे सांगण्यात आले. ठाकरे यांच्या अनुपस्थितीत त्यांचे सचिव मिलिंद नार्वेकर मात्र हजर होते. 
 
संबंधित लेख