पंडित नेहरू, इंदिरा गांधींची दूरदृष्टी मोदींनी दाखवावी : शिवसेनेने मुखपत्रातून मारला सरकारवर तीर

साडेचार वर्षे सरकारवर अतोनात टीका करुन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपशी युती करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा सरकारवर शरसंधान केले आहे. यावेळी निमित्त आहे ते जेट एअरवेजवर आलेल्या आपत्तीचे. 'जेट कर्मचाऱ्यांचा शाप घेऊ नका' अशा मथळ्याने लिहिलेल्या अग्रलेखात सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उद्योग वाचवण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या माध्यमातून सरकारला विचारला आहे.
पंडित नेहरू, इंदिरा गांधींची दूरदृष्टी मोदींनी दाखवावी : शिवसेनेने मुखपत्रातून मारला सरकारवर तीर

मुंबई : साडेचार वर्षे सरकारवर अतोनात टीका करुन आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात भाजपशी युती करणाऱ्या शिवसेनेने पुन्हा एकदा सरकारवर शरसंधान केले आहे. यावेळी निमित्त आहे ते जेट एअरवेजवर आलेल्या आपत्तीचे. 'जेट कर्मचाऱ्यांचा शाप घेऊ नका' अशा मथळ्याने लिहिलेल्या अग्रलेखात सरकारबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उद्योग वाचवण्याची जबाबदारी कुणाची असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या माध्यमातून सरकारला विचारला आहे. 

'जेट एअरवेजच्या २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. पंतप्रधानांसह संपूर्ण सरकार प्रचारात अडकले आहेत. जेट म्हणजे मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियाची ही महत्त्वाची प्रतिमा आहे. उद्योग वाढवणे व उद्योग वाचवणे हासुद्धा 'राष्ट्रवाद'आहे. हे आमच्या राजकारण्यांना कधी समजणार?  'किंगफिशर' वाचवता आली असती. ते  का झाले नाही?   किंगफिशर आणि जेट या उत्तम सेवा देणाऱ्या 'मेड इन इंडिया' म्हणजे देशी विमान कंपन्या होत्या.  हिंदुस्थानात येणारा आणि वाढणारा उद्योग म्हणजे राजकारण्यांना निवडणूक निधीसाठी कापता येणाऱ्या कोंबड्या आहेत. गळेकापू स्पर्धेतून किंगफिशरचे पंख कापले गेले व आता जेटचे मुंडके उडवले गेले काय? किंगफिशरप्रमाणे जेटही भंगारात जावे यासाठी कोणी पडद्यामागून सूत्रे हलवीत आहेत काय?' असे प्रश्न सामनाच्या अग्रलेखात उपस्थित करण्यात आले आहेत.

'आमची न्यायालये शाळा मास्तरांपासून राफेलपर्यंत सर्वच विषयांत हस्तक्षेप करतात व सरकारला आदेश देतात, पण जेट प्रकरणात त्यांनी हात वर केले.  पंतप्रधानांनी मनात आणले तर 'जेट'चा प्रश्न सहज सुटेल. ते काहीही करू शकतात. 'जेट'चा ताबा सरकारने घेऊन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचवाव्यात. पंडित नेहरू व इंदिरा गांधी यांनी विमान कंपन्यांचे व विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण का केले, ते आता कळले. त्यांना दूरदृष्टी होती. पंतप्रधान मोदींनीही ती जेट प्रकरणात दाखवावी. देशी उद्योग मोडायचे व परक्या गुंतवणुकीसाठी पायघड्या घालायच्या हे धोरण राष्ट्रीय नाही. साध्वीच्याच शापात दम आहे असे नाही, तर श्रम करणाऱ्यांचे रिकामे हात व उपाशी पोटाचे शाप साध्वीपेक्षा प्रखर आहेत.' अशा कडक शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या धोरणांवर टीका केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com