आमदार केळकरांचे निवडणुकीपूर्वी गाजर वाटप सुरू; शिवसेना नगरसेवकांची कडवट टीका

'गेली पाच वर्षे ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकासकामे न करणारे भाजपचे आमदार संजय केळकर आता ठिकठिकाणी पाहणी दौरे करून स्टंटबाजी करत मतदारांना आश्‍वासनांचे गाजर वाटप करीत आहेत,'असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी केला आहे. बाळकुम येथील यशस्वीनगर येथे असाच पाहणी दौरा आयोजित करून रहिवाशांची दिशाभूल केली जात असल्याची टीका स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांनी केली आहे.
आमदार केळकरांचे निवडणुकीपूर्वी गाजर वाटप सुरू; शिवसेना नगरसेवकांची कडवट टीका

ठाणे : 'गेली पाच वर्षे ठाणे विधानसभा मतदारसंघात कोणतीही ठोस विकासकामे न करणारे भाजपचे आमदार संजय केळकर आता ठिकठिकाणी पाहणी दौरे करून स्टंटबाजी करत मतदारांना आश्‍वासनांचे गाजर वाटप करीत आहेत,' असा आरोप शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक संजय भोईर यांनी केला आहे. बाळकुम येथील यशस्वीनगर येथे असाच पाहणी दौरा आयोजित करून रहिवाशांची दिशाभूल केली जात असल्याची टीका स्थानिक नगरसेवक म्हणून त्यांनी केली आहे.

विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. गेली पाच वर्षे अज्ञातवासात असलेले आमदार संजय केळकर यांना मतदारांच्या समस्यांची आता आठवण झाली आहे. संजय केळकर यांच्या आमदार पदाच्या कारकिर्दीत चार पावसाळे झाले. मात्र, तेव्हा मतदारांची आठवण झाली नाही. गेल्या पाच वर्षात नाल्याबाबत ना पत्र, ना पाठपुरावा संजय केळकर यांनी केला. आता मतदारच येत्या निवडणुकीत आमदार संजय केळकर यांना धडा शिकवतील, असा इशारा संजय भोईर यांनी लगावला आहे. शिवसेना नगरसेवकाकडून थेट भाजपच्या आमदाराला अशा प्रकारे इशारा दिल्याने ठाण्यातील शिवसेना आणि भाजपमधील दुरावा अद्याप कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यशस्वीनगर येथील गृहसंकुलानजीक मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीखालून नाला जातो. नाला अरुंद असल्याने पावसाळ्यात या ठिकाणी पाणी तुंबते. ठाणे महापालिका प्रशासनाने या नाल्याची पुनर्बांधणी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. मात्र, मुंबई महापालिकेने तांत्रिक अडचणीचे कारण देत या प्रस्तावास खोडा घातला. आमदार केळकरांनी या प्रश्‍नावर अद्यापही आवाज उठविला नाही. मात्र, केवळ निवडणूक तोंडावर आली असताना मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचे शिवसेनेच्या नगरसेवकानी आरोप केले आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com