उद्धव ठाकरेंच्या मताशी कॉंग्रेस सहमत

राज्यातील भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांचे सरकार निरुपयोगी आहे. या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मताशी कॉंग्रेस पक्ष सहमत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे.
उद्धव ठाकरेंच्या मताशी कॉंग्रेस सहमत

मुंबई : राज्यातील भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांचे सरकार निरुपयोगी आहे. या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मताशी कॉंग्रेस पक्ष सहमत आहे, असे प्रतिपादन कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केले आहे. 

उद्धव ठाकरे यांच्या सरकारबद्दलच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सावंत म्हणाले की, राज्यातील सरकारची विश्वासार्हता दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरत आहे. राज्यातील शेतक-यांचा प्रश्न अतिशय उग्र झाला आहे. या सर्व परिस्थितीमुळे जनतेत असंतोष वाढत चालला आहे. सत्तेत सहभागी असलेले सहयोगी पक्ष जनतेचा असंतोष पाहून सरकारविरोधात आंदोलन करू लागले आहेत. या आंदोलनात ज्या प्रकारचे शब्द वापरले जात आहेत ते पाहता सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर बेबनाव असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्रीच सरकारविरोधी आंदोलनात सहभागी होत आहेत. अशा त-हेचे विदारक आणि विसंवादी चित्र महाराष्ट्राच्या इतिहासात कधी दिसले नाही. 

शिवसेना व इतर घटक पक्षांनी या निरुपयोगी सरकारमध्ये निरुपयोगी होऊन राहण्यापेक्षा तत्काळ बाहेर पडून आपण काहीतरी उपयोगी आहेत, हे जनतेला दाखवून द्यावे असा टोला सावंत यांनी शिवसेनेला लगावला आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com