Shivsena boycotted today"s cabinet meeting -Ravte | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

शिवसेनेने मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला - रावते 

सूचिता रहाटे - सरकारनामा
बुधवार, 7 जून 2017

मुंबई : "शिवसेनेने आज मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला आहे .  शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी भूमिका आहे . कर्जमाफीबाबत  निर्णय घेण्यापूर्वी मुख्यमंत्र्यानी शिवसेनेची भूमिका समजावून घ्यायला  हवी होती . तसे झाले नाही म्हणून आम्ही मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला " ,   असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी 'सरकारनामा' शी बोलताना स्पष्ट केले. 

त्यांच्या आधीच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना रावते म्हणाले बैठकीला गैरहजर राहिलो म्हणजे बहिष्कारच टाकला . त्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन बाहेर पडलो असे होत नाही . 

श्री रावते म्हणाले , " आम्ही मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांना सांगितले की , आम्ही शेतकरी आंदोलनात जाहीरपणे  उतरलो  आहोत .  शिवसेना प्रमुख  उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी भूमिका आहे .शिवसेनेतर्फे राज्यभर मी कर्जमुक्त होणार हे अभियान चालविले जात आहे . आम्ही सरकर्माध्य सहभागी आहोत  त्यामुळे तुम्ही कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करण्यापूर्वी शिवसेनेची भूमिका समजावून घ्यायला हवी होती . अल्पभूधारक नाहीत तर सर्वच  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी शिवसेनेची आहे. तुम्ही आमची भूमिका समजावून न घेता एकतर्फी निर्णय घेतला . त्यामुळे आम्ही बैठकीस गैरहजर राहून बहिष्कार टाकीत आहोत . "

संबंधित लेख