भाजपशी घटस्फोट की सोयरिक? प्रकाश डहाकेंचे काय होणार ? 

Washim-Patni-Dahake
Washim-Patni-Dahake

वाशीम  : कारंजा विधानसभा मतदारसंघ सध्या भाजपच्या ताब्यात आहे. आमदार राजेंद्र पाटणी येथे प्रतिनिधीत्व करतात. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार प्रकाश डहाके यांनी केवळ या मतदारसंघात उमेदवारीच्या बोलणीवरच शिवसेनेचा शिवबंध हाती बांधला असून सेनेकडून त्यांची उमेदवारी पक्की समजण्यात येत आहे.मात्र शिवसेना स्वबळावर लढणार की भाजपशी युती होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे . 

कधी कट्टी तर कधी बट्टी  या रूसव्या फुगव्यात भाजप-शिवसेनेचा सत्ता संसार सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वेगळे लढण्याच्या घोषणेचे शिवसैनिकांनी स्वागत केले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप-सेना सोबतच लढणार असल्याची घोषणा केल्याने शिवसैनिक पुन्हा बुचकळ्यात पडले आहेत. 'एकला चलो रे'ची तयारी होत असताना जिल्ह्यातील तीनही विधासभा मतदारसंघाची राजकिय गणिते फिस्कटत असल्याचे चित्र आहे.

शिवसेनेचे भाजपशी जमले तर प्रकाश डहाकेंची अवस्था त्रिशंकू होणार आहे .  ऐन वेळी शिवसेना स्वबळावर उतरली तर डहाकेंना तयारीला वेळ कमी मिळणार आणि आतापासून तयारी केली आणि युती झाली तर केलेला खर्च वाया जाणार अशी परिस्थिती आहे . त्यामुळे डहाके प्रमाणेच शिवसेना आणि भाजपचे उमेदवार जागोजागी संभ्रमात असल्याचे चित्र आहे . 

वाशीम जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघामधे वाशीम व कारंजा भाजपकडे तर रिसोड कॉंग्रेसकडे आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची युती राहणार नसल्याची घोषणा खुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनीच केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील तीनही विधासभा मतदारसंघात शिवसेनेने उमेदवार शोधण्यास सुरुवात केली.

 रिसोड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सभापती विश्वनाथ सानप यांनी तयारी सुरू केली आहे. मालेगाव येथे कृषी प्रदर्शनीच्या माध्यमातून त्यांनी श्रीगणेशा केला. रिसोड विधानसभा मतदार संघाच्या  राजकीय  गणितात सानप यांची तयारी लक्षवेधी ठरली होती. वाशीम विधानसभा मतदार संघातही शशिकांत पेंढारकर यांची तयारी सुरू आहे. 

मात्र गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी पुन्हा युतीचे सुतोवाच केल्याने एकत्र की स्वतंत्र? ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेनेही अधिकृत प्रतिक्रिया दिली नसल्याने एकत्रच लढायचे तर तयारी कशाला? असे म्हणून शिवसेनेची आक्रमकता पुन्हा बोथट होत असल्याचे चित्र आहे.                                                                                                                                                                                                                                                                                  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com