Shivsena-BJP poster war in akola | Sarkarnama

उद्धवसाहेब, आपण करून दाखवलं! 

श्रीकांत पाचकवडे 
बुधवार, 14 जून 2017

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सुरू असलेली श्रेयवादाची लढाई आता टोकावर गेली आहे. भाजपने कर्जमुक्तीचे लावलेले पोस्टर फाडल्यानंतर आता शिवसेनेमुळेच कर्जमुक्ती झाली, असे पोस्टर लावून कर्जमुक्तीच्या निर्णयाचे शिवसेनेनेकडून जोरदार मार्केटींग करण्यात येत आहे. शिवसेनेने नाक दाबलं म्हणून सरकारचे कर्जमुक्ती जाहीर करण्यास तोंड उघडलं, "उद्धवसाहेब, आपण करून दाखवलंब' असे पोस्टर शिवसेनेकडून जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. 

अकोला : राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून सत्ताधारी भाजप-शिवसेनेत सुरू असलेली श्रेयवादाची लढाई आता टोकावर गेली आहे. भाजपने कर्जमुक्तीचे लावलेले पोस्टर फाडल्यानंतर आता शिवसेनेमुळेच कर्जमुक्ती झाली, असे पोस्टर लावून कर्जमुक्तीच्या निर्णयाचे शिवसेनेनेकडून जोरदार मार्केटींग करण्यात येत आहे. शिवसेनेने नाक दाबलं म्हणून सरकारचे कर्जमुक्ती जाहीर करण्यास तोंड उघडलं, "उद्धवसाहेब, आपण करून दाखवलंब' असे पोस्टर शिवसेनेकडून जिल्ह्यात लावण्यात आले आहेत. 

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेसह अनेक संघटनांनी राज्यभर आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेनेही शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आंदोलनात उडी घेत राज्यभर भाजप सरकारविरोधात आंदोलने करून कर्जमुक्तीची मागणी रेटून धरली होती. 

राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांकडून कर्जमाफीच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. यात शिवसेनाही मागे नसून शिवसेनेमुळेच कर्जमुक्ती झाली असा प्रचार सेनेच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. अकोल्यात शेतकरी कर्जमुक्तीवरून भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये वाद पेटला असून दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर चिखलफेक करण्यात येत आहे. 

कर्जमुक्तीचा निर्णय होण्याआधीच गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी कर्जमुक्तीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या आभाराचे पोस्टर लावले होते. मात्र, कर्जमाफीचा निर्णय न होताच पोस्टर लावून भाजप नेत्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभुल करण्यात येत असल्याचा आरोप करीत शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी गृहराज्यमंत्र्यांनी लावलेले पोस्टर फाडले होते. त्यानंतर शिवसेनेने "शेतकऱ्यांनो महाखोटारड्या लोकांपासून सावधान' असे पोस्टर लावून भाजपची टर उडवली होती. त्यानंतर पालकमंत्री रणजित पाटील आणि शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन देशमुख यांच्यात पाणचट राजकारण कुणाचे? यावरून वाद रंगला होता. आता तर शिवसेनेमुळेच कर्जमुक्ती झाली असून शिवसेनेने नाक दाबलं म्हणून सरकारचे कर्जमुक्ती जाहीर करण्यास तोंड उघडलं असे शिवसेना पश्‍चिम विदर्भ संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत यांचे पोस्टर लावून शिवसेनेकडून भाजपवर हल्लाबोल करण्यात येत आहे. 

संबंधित लेख