Shivsena BJP Nashik Politics | Sarkarnama

भाजप नगरसेवकांना शिवसेनेची धक्काबुक्की : करवाढी विरोधात शिवसेना नगरसेवक आक्रमक

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

करवाढीचा विषय आजच्या महासभेचा नाही. विषयपत्रिकेतही त्याचा समावेष नाही. त्यावरुन गोंधळ घालणे अयोग्य आहे. त्याने आमच्यावर परिणाम होणार नाही. शहराच्या हितासाठी आम्ही करवाढ करणारच - महापौर रंजना भानसी,

नाशिक : महापालिकेच्या विविध करांत 18 ते 45 टक्के करवाढ होणार आहे. त्या विरोधात आज झालेल्या महासभेत शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांचा राजदंड पळवला. यावेळी झालेल्या गोंधळात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना शिवसेनेच्या नगरसेवकांनी धक्काबुक्कीही केली. त्यामुळे महासभेत तहकूब करावी लागली. भविष्यातही हे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेत स्वबळावर सत्तेत येताच करवाढीची चर्चा आता प्रत्यक्षात आली आहे. घरपट्टी व पाणीपट्टीत वाढ होणार आहे.  त्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानाची खिल्ली उडवत अन्यायकारक दरवाढ मागे घ्यावी अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला होता. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या महासभेत सर्वच विरोधी पक्षांनी या करवाढीला प्रखर विरोध केला. शिवसेनेने आक्रमकपणे हा विषय मांडल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांच्या सुरात सूर मिसळला.

महापालिका स्थायी समितीने आज घरपट्टीत 18 टक्के, तर पाणीपट्टीत 120 टक्‍क्‍यांपर्यंत वाढ करण्याचा आज निर्णय घेतला. स्मार्ट सिटी तसेच अमृत प्रकल्पाची कामे मार्गी लावण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे प्रशासनाने सांगितले. या पार्श्र्वभूमीवर आजच्या महासभेत त्याचे पडसाद उमटले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सर्वच पक्षाच्य़ा सदस्यांनी यावर खुलासा करण्याची मागणी केला. तेव्हा 'आजच्या महसाभेच्या विषय पत्रिकेत त्याचा समावेष नाही. त्यामुळे यावर चर्चा होणार नाही', असे महापौरांनी स्पष्ट केले. त्यावर विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी याबाबत पत्र दिले आहे. त्याचे वाचन करावे असी मागणी केली. त्याला नकार दिल्यावर गोंधळाला सुरवात झाली.

त्यात तिन्ही पक्षाच्या सदस्यांनी महापौरांचा दंड पळवला. यावेळी चांगलीच झटापट झाली. त्यात भाजपच्या सदस्यांना धक्काबुक्कीही झाली. त्यामुळे या विषयावरुन आता राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

स्थायी समितीने घऱपट्टी, पाणीपट्टीत वाढ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. हा बोजा नागरीकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे त्याचा महासभेत समावेष करण्यास शिवसेनेचा विरोध आहे. आम्ही ही करवाढ होऊ देणार नाही - अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते.
 

सरकारनामाच्या अन्य बातम्या :

माझ्या बायकांच्या भानगडी असतील तर त्याही छापा : शेट्टी

मनसेच्या 'मैफिली' सुन्या-सुन्या......: 'त्या' गर्दीचा नेते-कार्यकर्ते घेत आहेत शोध

'मनसे'चे राज फेसबुकवरुन खुलणार! : सोशल मिडियातून फेसव्हॅल्यू मिळवेन : राज ठाकरे

भाजपच्या अंगणात राणे पिता-पुत्रांची २७ अगोदरच एन्ट्री नक्की..?

संबंधित लेख