Shivsena BJP Maharahtra Politcal news | Sarkarnama

उद्धव ठाकरे यांना मुनगंटीवारांनी भेट दिला आवाज करणारा वाघ

ब्रह्मा चट्टे
बुधवार, 21 जून 2017

1 जुलै ते 7 जुलै वनसप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सुरुवात 1 जुलैला ऐरोली मधून होणार आहे. याचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यासाठी आलो होतो. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. 1 जुलै ला राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्धवजी, मंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. - सुधीर मुनगंटीवार

मुंबई : वनमंत्री व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे याची भेट घेण्यासाठी 'मातोश्री'वर गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुनगंटीवार यांना बांबूपासून बनवलेला झेंडा आणि आवाज करणारा वाघ भेट दिला. या भेटींमुळे आमच्यातला तणाव कमी होऊन मैत्री वाढावी असे प्रयत्न होत असतील तर चांगले असल्याचे स्पष्टीकरण सुधिर मुनगंटीवारांनी दिले आहे. ४ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी 'मातोश्री'वर आल्यानंतर मुनगंटीवार माध्यमांशी बोलत होते.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ''1 जुलै ते 7 जुलै वनसप्ताह साजरा करण्यात येणार आहे. सुरुवात 1 जुलैला ऐरोली मधून होणार आहे. याचे निमंत्रण ठाकरे यांना देण्यासाठी आलो होतो. त्यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. 1 जुलै ला राज्यपाल, मुख्यमंत्री, उद्धवजी, मंत्री यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.''

युतीतील तणावावर बोलताना ते म्हणाले, ''गेल्या वर्षी 1 जुलैला युतीचे म्हणून एक झाड माहीमला लावले होत ते नीट आहे तुम्ही (माध्यमांनी) काळजी करू नये,'' जिल्हा बँकांच्या नोटा बदलून देण्याच्या निर्णयावर प्रतिक्रीया देताना मुनगंटीवार म्हणाले, नोटा बदलून मिळाल्याने कॅश फ्लो वाढेल. जिल्हा बँकांमध्ये जुन्या नोटा पडून आहेत त्यामुळे जिल्हा बँकांना अडचणी येत आहेत त्या बदलून द्याव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली केंद्राला मागणी केली आहे.''

संबंधित लेख