शिवसेना-भाजपचं अखेर जमलं ? 

शिवसेना-भाजपचं अखेर जमलं ? 

पुणे : पालघरसह 23 जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी भाजपने दाखविली असून दोन्ही पक्ष आगामी लोकसभा निवडणूक पुन्हा एकदा हातात हात घालून लढणार आहेत. दोन्ही पक्षांची युती जवळपास निश्‍चित झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 

दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मातोश्रीवर गेले होते. तेथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची त्यांनी भेटही घेतली होती. आगामी निवडणुकीसाठी युतीची चर्चाही केली होती. पण, जम्मू-काश्‍मिरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे ही चर्चा नीट होऊ शकली नाही असे खुद्द फडणवीस यांनी म्हटले होते.

पुन्हा दोन्ही पक्षात चर्चा होणार असली तरी युती जवळपास झाल्याचे कळते. लोकसभा आणि विधानसभा जागा वाटपांचा तिढाही सुटला असून कोणी कुठे लढायचे हे जवळपास निश्‍चित झाले आहे. तशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना फडणवीस यांनी दिल्याचेही कळते. 

लोकसभेच्या 23 जागांवर शिवसेना आणि 25 जागांवर भाजप लढणार आहे. तसेच विधानसभेच्याही निम्म्या निम्म्या जागा लढण्यावर एकमेत झाले आहे. ज्या काही जागांसाठी टोकाचे मतभेद होते. ते मिटले आहेत. पालघरची लोकसभेची जागा शिवसेनेला सोडण्याची तयारीही भाजपने दाखविली आहे. त्यामुळे तेथे शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. शिवसेनेने सातत्याने भाजपवर टीका करीत आली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने युती तोडल्यानंतर शिवसेना कमालीची नाराज झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर ती विरोधीबाकावरही बसली होती. त्यानंतर ती सत्तेवर आली. 

2019 मध्ये पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. यापुढे दोन्ही निवडणुकांसाठी युती असणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com