युतीची "कट्‌टी' सुटली...! फडणवीस-ठाकरेची जोडी जुळली ...! 

युतीची "कट्‌टी' सुटली...! फडणवीस-ठाकरेची जोडी जुळली ...! 

मुंबई : लोकसभेतील यशानंतर मित्रपक्ष शिवसेनेला सापत्न वागणूक देत सत्तेची सूत्र एकहाती सांभाळणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आता शिवसेनेसोबतची "मैत्री' पुन्हा भक्‍कम केली आहे. चार वर्षे शिवसेना व भाजप मधला कलगीतुरा संपला असून, "कट्‌टी सुटली, युती जुळली' असा संदेशच आज उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. 

लोकसभेनंतर शिवसेना भाजप युतीत कमालीचा दुरावा झाला होता. शिवसेनेने तर "दगाबाज मित्र' अशा अविर्भावात भाजपवर शरसंधान साधले होते. आता युतीचा कटोरा घेवून कोणापुढेही जाणार नाही. शिवसेना सर्व निवडणूका स्वबळावरच लढणार. अशी भिष्मप्रतिज्ञा ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रातून भाजपच्या सत्तेवर अत्यंत टोकाची कडवट टीका करत युतीत सर्वकाही अलबेल नसल्याचे संकेत दिले जात होते. 

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीत तर शिवसेना व भाजप कार्यकर्तेच नव्हे तर नेते देखील आमने सामने भिडले होते. शिवसेनेला पाण्यात पाहण्याची एकही संधी भाजप आमदारांनी सोडली नव्हती. तर भाजपच्या कारभारावर आसूड ओढल्याशिवाय शिवसेनेचा एकही दिवस जात नव्हता. महापालिका निवडणूकांत तर या दोन्ही पक्षातील कमालीचा संघर्ष रस्त्यावर देखील आला होता. 

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी राष्ट्रपती निवडणूकीच्या दरम्यान मातोश्रीवर जावून ठाकरे यांची भेट घेतली. त्याचवेळी युतीचे तुटलेले धागे जोडण्याची प्रक्रीया सुरू झाल्याचे मानले जात होते. त्यातच शिवसेनेवरच नव्हे तर थेट ठाकरे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजप खासदार किरीट सोमय्या यांचे गेल्या वर्षभरातील मौन देखील बरेच काही सांगून जात होते. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com