shivsena bad parformance in sangli | Sarkarnama

सांगलीत भाजपचा हात झिडकारणाऱ्या शिवसेनेच्या हाती भोपळा! 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सांगली : स्वबळाचा नारा देऊन भाजपसह स्थानिक आघाडीचा हात झिडकारणारी शिवसेना सांगली, मिरज, कुपवाड तीनही शहरांत चित्रातही दिसेना झाली आहे. आमच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही, असे सांगणाऱ्या सेनेच्या हाताला येथे काहीच लागलेले नाही, असेच आतापर्यंतचे चित्र आहे. शिवसेनेत वाजत गाजत आलेले नगरसेवक शेखर माने यांच्या हक्काच्या प्रभागात भाजपने झेंडा रोवला आहे. तेथे चारही जागांवर भाजपने बाजी मारली आहे. 

शिवसेनेने येथे प्रचारात रंग आणला होती. बडे नेतेही प्रचाराला आले होते, मात्र निवडणूक जिंकण्यासाठी केवळ सभा पुरेशा नसतात त्यासाठी नियोजन लागते, हे शिवसेनेने मनावर घेतलेच नाही. त्यामुळे भाजपने युतीसाठी पुढे केलेला हात झिडकारला. राज्यासाठी एकच धोरण असेल असे सांगत भाजपसोबत कदापी जाणार नाही, अशी भूमिका घेतली. 

माजी आमदार संभाजी पवार गटाची शहरात ताकद आहे. ते शिवसेनेसोबत होते, मात्र जातीय गणितात आघाडीचा प्रस्ताव होता. स्वाभिमानी विकास आघाडी या पवार गटाच्या संघटनेला काही जागांवर लढू द्या, असा प्रस्ताव दिला होता. शिवसेनेने तो अमान्य केल्याने पवारांची ताकद शिवसेनेतून वजा झाली. काही हातचे उमेदवार शिवसेनेला राखता आले नाहीत. 

दुसऱ्या बाजूला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या सभा झाल्या नाहीत. शिवसेना प्रचारात गती घेत होती, मात्र निवडणुक रिंगणात विजयाच्या शर्यतीत ती कधीच आली नाही. किंबहुना आम्ही विजयासाठी नव्हे तर पुढच्या पेरणीसाठी लढतोय, असे नेते स्वतःला सांगून समजूत काढत राहिले. त्यामुळे सेना चित्रातही येऊ शकली नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख