Shivsena answers Karnataka Govt | Sarkarnama

कर्नाटक बसवर जय महाराष्ट्र- शिवसेनेने दिले हुकूमशाहीला उत्तर

सुनील पाटील
मंगळवार, 23 मे 2017

कर्नाटक सरकार व कन्नडच्या विरोधात बोलणाऱ्या महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. कर्नाटक व सिमाभागात "जय महाराष्ट्र'बोलण्यास बंदी घालण्याचा कायदा करणार असल्याचे कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी काल (सोमवार) दिला होता. यावर महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात तीव्र पडसाद उमटले. याला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरात शिवसेनेच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानक कर्नाटकमधून कोल्हापूरात येणार व जाणाऱ्या बस वरती जय महाराष्ट्र चे फलक लावून कर्नाटकच्या नव्या जुलमी निर्णयाला विरोध केला.

कोल्हापूर - 'जय महाराष्ट्र' म्हटल्यावर महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द करणार म्हणाऱ्या कर्नाटक सरकारची हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही. त्यांच्या हुकूमशाही फतव्याला कोल्हापूरात आज शिवसेनेच्यावतीने कर्नाटक बसवर 'जय महाराष्ट्र' चे फलक लावून उत्तर दिले. दरम्यान, 'जय शिवाजी-जय भवानी' सह 'जय महाराष्ट्र' च्या घोषणेने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थान परिसर दणाणून गेला.

कर्नाटक सरकार व कन्नडच्या विरोधात बोलणाऱ्या महापालिका व नगरपालिका सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. कर्नाटक व सिमाभागात "जय महाराष्ट्र'बोलण्यास बंदी घालण्याचा कायदा करणार असल्याचे कर्नाटकचे नगर विकासमंत्री रोशन बेग यांनी काल (सोमवार) दिला होता. यावर महाराष्ट्रासह कर्नाटक सीमाभागात तीव्र पडसाद उमटले. याला उत्तर देण्यासाठी कोल्हापूरात शिवसेनेच्यावतीने मध्यवर्ती बसस्थानक कर्नाटकमधून कोल्हापूरात येणार व जाणाऱ्या बस वरती जय महाराष्ट्र चे फलक लावून कर्नाटकच्या नव्या जुलमी निर्णयाला विरोध केला.

शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार म्हणाले, कर्नाटक सरकारने सीमाभागातील लोकांवर अत्याचार केले आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारने यात तोडगा काढायला हवा होता. मात्र, यावर कोणतीही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळेच वारंवार असे हुकूमशाही पध्दतीचे फतवे काढण्याचे काम कर्नाटक सरकारकडून केले जात आहे. "जय महाराष्ट्र' म्हणण्यालाही बंदी घातली जात असताना राज्य सरकार किंवा केंद्र सरकार याकडे गांर्भियाने पाहत नाही. येवढे सगळे होत असतान शिवसेना गप्प बसणार नाही. त्यांना योग्य ते उत्तर देण्याचे काम केले असल्याचेही श्री पवार यांनी सांगितले.

संबंधित लेख