shivsena and yogi adityanath | Sarkarnama

योगी सरकारने शिवसेनेचा धसका घेतला, अयोध्येला छावणीचे स्वरूप

जगदीश पानसरे
शुक्रवार, 23 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : महाराष्ट्रासह राज्यभरातून अयोध्येत हजारोंच्या संख्येने दाखल होत असलेले शिवसैनिक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या (ता.24) दौऱ्याचा धसका उत्तर प्रदेशातील योगी सरकारने घेतल्याचे चित्र संपूर्ण अयोध्येत आहे. शरयू नदीचा घाट, शहरातील आखाड्यांचा परिसर अक्षरशः भगवा झाला असून जागोजागी भगवे झेंडे, बाळासाहेब, उध्दवसाहेबांचे होर्डिंग दिसत आहे. 

औरंगाबाद : महाराष्ट्रासह राज्यभरातून अयोध्येत हजारोंच्या संख्येने दाखल होत असलेले शिवसैनिक व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उद्याच्या (ता.24) दौऱ्याचा धसका उत्तर प्रदेशातील योगी सरकारने घेतल्याचे चित्र संपूर्ण अयोध्येत आहे. शरयू नदीचा घाट, शहरातील आखाड्यांचा परिसर अक्षरशः भगवा झाला असून जागोजागी भगवे झेंडे, बाळासाहेब, उध्दवसाहेबांचे होर्डिंग दिसत आहे. 

शिवसैनिकांनी कुठलीही आगळीक करू नये यासाठी अयोध्या आणि राम मंदिर परिसरात लष्कर आणि पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आल्याची माहिती औरंगाबादचे जिल्हाप्रमुख व या दौऱ्याचे समन्वयक अंबादास दानवे यांनी सरकारनामाशी बोलतांना दिली. शरयू नदीचे पूजन, महाआरती, संत-मंहतांचे आर्शिवचन अशा सगळ्याच नियोजित कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या आगमानाची वेळ जसजशी जवळ येत आहे, तसा पोलीस बंदोबस्त अयोध्येत वाढवण्यात येत आहे. शिवाय कुठालाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कलम 144 देखील लागू करण्यात आले आहे. 

विश्‍व हिंदू परिषदेने देखील 25 नोव्हेंबर रोजीच इथे धर्मसभेचे आयोजन केले होते. पण प्रशासनाने मंदिर परिसर किंवा आयोध्येत कुठेही, कोणत्याच राजकीय पक्षाला सभा घेण्यास परवानगी दिलेली नाही, किंवा यापुर्वी दिली गेलेली नाही. 
शिवसैनिकांशी संवाद साधणारच 
सभेला परवानगी नसली तरी संत-मंहताकडून आर्शिवचन झाल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याच ठिकाणी देशभरातून आलेल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. मुख्य आखाडा समितीच्या साधू-संतांनी शिवसेनेचे निमंत्रण धुडकावले अशा बातम्या प्रसारमाध्यमांकडून पसरवल्या जात आहेत. पण त्यात तथ्य नाही, शिवसेनेने ज्या ज्या संत-महंतांना आमंत्रण दिले ते त्यांनी स्वीकारले असून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेला आपला पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय त्यांच्या उपस्थितील कार्यक्रमांना देखील संत-महंत हजेरी लावणार आहेत. 

रश्‍मी, आदित्य ठाकरेही येणार.. 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतच रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे देखील उद्या (ता. 24) दुपारी एक वाजता आयोध्येत येणार आहेत. तत्पुर्वी आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या भेटीमागची भूमिका स्पष्ट केली. 
 

संबंधित लेख