SHIVSENA and sainik | Sarkarnama

बाळासाहेब आस्थेने कुटुंबियांची चौकशी करायचे

अॅड. अनिल काळे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

अकोला : मराठी अस्मिता आणि प्रखर हिंदुत्वासाठी आयुष्यभर लढणारे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आक्रमक वक्तृत्वाने भारावून जात महाविद्यालयीन जीवनापासून शिवसेनेशी नाते जुळले. मातोश्रीवर अनेकदा गेलो, तेव्हा बाळासाहेब आस्थेने विचारपुस करीत असत. काय अनिल मुलं-बाळं कशी आहेत हे शब्द त्यांच्या तोंडून ऐकल्यावर मानसिक समाधान मिळेच पण सर्वांत महत्वाचे म्हणजे आपले दैवत सर्वसामान्य शिवसैनिकाप्रती येवढी काळजी करतात, त्याचा जास्त अभिमान वाटत असे, अशा आठवणी शिवसेनेचे पश्‍चिम विदर्भ कायदे विभाग प्रमुख ऍड अनिल काळे यांनी सांगितल्या. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनी शनिवारीकाळे बोलत होते. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात 19 जून 1966 हा दिवस तमाम मराठी माणसांसाठी गौरव दिनच म्हणावा लागले. कारण याच दिवशी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत मराठी माणसांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत मराठी माणसांच्या संरक्षणासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठामपणे उभे राहिलेत. त्यांची मराठी माणसांप्रती असलेली आत्मीयता आणि प्रखर हिंदुत्वामुळे महाविद्यालयीन जिवनापासूनच मी त्यांना आदर्श मानत होतो. 

शिवसेनेशी नाते जुळल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात पक्षसंघटन वाढविण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. गाव तेथे शिवसेना आणि घर तेथे शिवसैनिक हा बाळासाहेबांचा नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री दिवाकरराव रावते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तमाम शिवसैनिक जीव ओतून कामाला लागलो. पक्षहितासाठी केलेल्या कार्यामुळे पक्षाच्या नेत्यांनी पक्ष संघटनेत अनेक जबाबदाऱ्या दिल्या. रावते यांच्यासोबत मातोश्रीवर जाण्याचा अनेकदा योग आला. रावतेंनीच बाळासाहेबांशी भेट घालून देत पक्षहितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. त्यावर बाळासाहेबांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. त्यानंतर अनेक वेळा मातोश्रीवर त्यांच्या भेटीला गेलो की बाळासाहेब काय अनिल मुलं-बाळं कसे आहेत, अशी आस्थेने विचारपुस करायचे. त्यांचे ते शब्द ऐकल्यावर मानसिक समाधान तर मिळायचेच महत्वाचे म्हणजे आपले दैवत शिवसैनिकांची तळमळीने काळजी हे पाहून मन भारावून जायचे. आज बाळासाहेब आपल्यात नाहीत. मात्र, त्यांनी दिलेल्या संस्कारातूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात समाजसेवा करण्याचा आयुष्यभर प्रयत्न राहणार असल्याचे अनिल काळे म्हणाले. 

(शब्दांकन : श्रीकांत पाचकवडे ) 
 
संबंधित लेख