shivsena and ram mandir | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

औरंगाबादमधून पाचशेवर शिवसैनिक अयोध्येकडे रवाना

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यासाठी औरगांबादहून पाचशेवर शिवसैनिक रवाना झाले आहेत. आज दुपारी किराडपुरा येथील राम मंदिरात महाआरती केल्यानंतर शिवसैनिकांचा एक जथ्था भुसावळ मार्गे आयोध्येला रवाना झाला. महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांनी शिवसैनिकांना अयोध्या दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या. उध्दव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा दर्शवत युवासेनेच्या वतीने शहरातून भव्य वाहन रॅली देखील काढण्यात आली. 

राम मंदिराचा मुद्दा हाती घेऊन शिवसेनेने भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे स्वःत 24 व 25 फेब्रुवारी रोजी अयोध्येत जाऊन संत-महंताच्या भेटी, शरयू नदीचे पूजन, महाआरती आणि रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. शिवसेनेच्या वतीने या दौऱ्याची जय्यत तयारी गेल्या महिनाभरापासून अयोध्येत केली जात आहेत. त्यासाठी शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी अयोध्येत ठाण मांडले आहे. राज्यभरातून शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येकडे निघाले आहेत. 

औरंगाबादमधून या पूर्वीच शिवसैनिकांची एक तुकडी अयोध्येत दाखल झाली आहे. आज आणखी काही शिवसैनिक व पदाधिकारी बसने भुसावळ व तिथून रेल्वेने अयोध्येला रवाना झाले आहेत. या शिवाय उद्या (ता.23) तीस शिवसैनिकांचा एक गट विमानाने आयोध्येला जाणार आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते अयोध्येत ज्यावेळी महाआरती केली जाईल, तेव्हाच औरंगाबाद शहरातील प्रत्येक वार्ड व मुख्य चौकातील राम मंदिरांमध्ये एकाचवेळी महाआरती करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवसेनेच्या काही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या शहरातच थांबण्याचे आदेश उध्दव ठाकरे यांच्याकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन हे शहरातच थांबून आहेत. 

अयोध्येतील सभेबद्दल उत्सुकता 
उध्दव ठाकरे यांची अयोध्येत जाहीर सभा होणार होती, मात्र त्याला न्यायालयाच्या आदेशामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परवानगी नाकारल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अयोध्येत ठाकरे यांची सभा होणार की नाही याची उत्सुकता शिवसैनिकांना लागली आहे. जाहीर सभा होणार नसली तरी देशभरातून आलेल्या शिवसैनिकांशी उध्दव ठाकरे संवाद साधणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी कळवले आहे. 

संबंधित लेख