shivsena and maratha andolan | Sarkarnama

आम्हाला पैसे नको, खासदारकीचा राजीनामा द्या : सोनवणे कुटुंबियांनी शिवसेनेची मदत नाकारली

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 जुलै 2018

औरंगाबाद : " माझ्या वडीलांनी समाजासाठी, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. पण पोलीस सांगतात त्यांचा मराठा आंदोलनाशी संबंध नव्हता. वडिलांच्या बलिदानावरच जर संशय व्यक्त केला जात असेल तर आम्हाला शासनाचे आणि तुमचेही पैसे नको' पैशासाठी माझ्या वडलांनी जीव दिलेला नाही. आमच्या बद्दल तुम्हाला सहानुभूती असेल तर मराठा आरक्षणाला पांठिबा म्हणून खासदारकीचा राजीनामा द्या' अशी मागणी करत जगन्नाथ सोनवणे यांच्या कुटुंबियांनी शिवसेनेच्या वतीने देण्यात येणारी दोन लाख रुपयांची मदत गुरुवारी (ता.26) नाकारली. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलन सुुरू असतांना कन्नड तालुक्‍यातील देवगांव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केले होते. उपचारा दरम्यान औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. परंतु जगन्नाथ सोनवणे यांच्या मृत्यूचा मराठा आंदोलनाशी संबंध नाही. आंदोलनाच्या ठिकाणापासून लांब अंतरावर असलेल्या शेतातून पोलीसांनी बेशुध्द अवस्थेत त्यांना उचलून आणले होते असा दावा पोलीसांच्या वतीने करण्यात आला होता. 

या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे व इतर पदाधिकारी गुरूवारी देवगांव रंगारी येथे सोनवणे कुटुंबियांची भेट घेण्यासाठी गेले होते. जगन्नाथ सोनवणे यांचा मुलगा व कुटुंबातील इतर सदस्यांचे सांत्वन केल्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेच्या वतीने दोन लाख रुपयांची मदत देऊ केली. मात्र वडीलांच्या मृत्यूबद्दल पोलीसांकडून संशय व्यक्त केला जात असल्याबद्दल सोनवणे कुटुंबियांनी खैरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. माझ्या वडलांनी पैशासाठी आत्महत्या केली नाही हे तुमची मदत नाकारून आम्हाला दाखवून द्यायचे आहे. तुम्ही सांत्वनासाठी आलात हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे आम्हाला तुमची आर्थिक मदत नको. 

या उलट मराठा आरक्षणाच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवत आपणच आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी सोनवणे कुटुंबिय आणि तिथे उपस्थिीत असलेल्या तरूणांनी चंद्रकांत खैरे यांच्याकडे केली. त्यावर जिल्हाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपण जगन्नाथ सोनवणे यांच्या मृत्यूबद्दलचा वस्तुनिष्ठ अहवाल मागू आणि प्रशासनाला जाब विचारू असे आश्‍वासन खैरे यांनी सोनवणे कुटुंबियांना दिले. 
 
संबंधित लेख