shivsena and bjp politics mumbai | Sarkarnama

शिवसेनेला जशास तसे उत्तर देण्याची भाजपची तयारी 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई : भाजप शिवसेनेत पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या असून यापुढे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने आरोपांची चिखलफेक केल्यास भाजपने ही त्याला जशास तसे चोख उत्तर देण्याची भूमिका घेतली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. 

मुंबई : भाजप शिवसेनेत पुन्हा एकदा आरोपप्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या असून यापुढे शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने आरोपांची चिखलफेक केल्यास भाजपने ही त्याला जशास तसे चोख उत्तर देण्याची भूमिका घेतली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. 

मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपचा विजय मनी आणि मुनी यांच्यामुळे झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यानी केला होता. या आरोपाला उत्तर देणाऱ्या प्रतिक्रिया भाजपच्या चार नेत्यांकडून आल्या. भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यासह नेहमीच शिवसेनेवर तोंडसुख घेणारे खासदार किरीट सोमय्या आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एकापाठोपाठ प्रतिक्रिया देत शिवसेने जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी भाजप हाच आपला नंबर एकचा शत्रू असल्याची भावना व्यक्त झाली होती. त्यामुळे ,भाजपने आता शिवसेनेबरोबर 2019च्या निवडणुकीत युती होण्याच्या शक्‍यता नसल्याचे गृहीत धरून पुढे चालण्याचे ठरविले आहे. 

भाजपला मीरा भाईंदर मध्ये मिळालेल्या यशामुळे पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. शिवसेनेला जशास तसे उत्तर देऊन वटवट बंद करायला हवी असे भाजपच्या नेत्याना वाटत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना भाजपवर टीका करताना कमलाबाई असा गमतीने उल्लेख करायचे. महाराष्ट्रात सुरवातीच्या काळात भाजपने लहान भावाची भूमिका निभावली. परंतु नरेन्द्र मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठा भाऊ कोण यावरून शीतयुध्द सुरू झाले. संजय राऊत यांच्या आरोपाला उत्तर देताना भाजपच्या आशिष शेलार यांनीही शेलक्‍या शब्दात टीका करताना सेनेत चोरटे आणि भूरटे असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता भाजपने शिवसेनेला प्रत्युत्तर देताना कडक भाषा वापरण्यास सुरुवात केली असल्याचे दिसून येत आहे. 
 

 
 

संबंधित लेख