shivsena and bjp | Sarkarnama

पाहुणचाराची तयारी होती, पण पाहुणे आलेच नाहीत - किशनचंद तनवणींचा शिवसेनेला टोला

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

औरंगाबाद : शिवसेनेने आंदोलनाच्या स्टंटबाजीसाठी नाहक मुक्‍या जनावरांना त्रास दिला, आम्ही त्यांचे पाहुणे आहोत असे सांगून त्यांनी जनावर भाजप कार्यालयात आणण्याचा प्रयत्न केला. मग पाहुणे म्हणून आम्ही देखील त्यांचा पाहुणचाराची तयारी केली होती, पण ते आलेच नाहीत अशा शब्दांत भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शिवसेनेला टोला लगावला. 

राज्याचे गृहराज्यमंत्री व नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नकतेच "जनावारांना चारा नसला तर त्यांना पाहुण्यांकडे नेऊन सोडा' असे वादग्रस्त विधान केले होते. यावरून भाजप व राम शिंदेंवर चोहोबाजूने टीका होत असतांना शिवसेनेने देखील त्यांची कोंडी करण्याची संधी हेरली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादेत चाऱ्याअभावी उपाशी असलेली जनावर घेऊन ती भाजप जिल्हा कार्यालयावर नेण्याचे आंदोलन करण्यात आले. पण दोन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उडू नये यासाठी पोलीसांनी अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना क्रांतीचौकातूनच अटक करून नेले. 

दरम्यान, शिवसेना गुरं-ढोर घेऊन उस्मानपुरा येथील भाजपच्या विभागीय कार्यालयावर येणार असल्याची माहिती मिळाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते देखील तिथे मोठ्या संख्येने जमले होते. शिवसैनिकांनी जनावर आणून बांधलीच तर त्यांच्या चारा-पाण्याची सोय भाजप पदाधिकाऱ्यांनी करून ठेवली होती. 

शिवसेनेने नाते स्पष्ट करावे 
शिवसेनेच्या या आंदोलनावर सरकारनामाशी बोलतांना किशनचंद तनवाणी म्हणाले, शिवसेनेने भाजपला पाहुणा म्हटले आहे, त्यांनी एकदा त्यांचे आमच्याशी नाते काय हे आधी स्पष्ट करावे. उगाच स्टंट करून मुक्‍या जनावारांना वेठीस धरू नये. शिवसैनिक पाहुणे म्हणून भाजप कार्यालयावर येणार असल्यामुळे आम्ही त्यांच्या पाहुणचाराची तयारी केली होती, पण ते आलेच नाहीत. आम्ही त्यांचे स्वागतच केले असते असे म्हणत त्यांनी शिवसेनेला चिमटा काढला. 
 
संबंधित लेख