आंतरराष्ट्रीय विमानतळ कोनशिला कार्यक्रमाचे निमंत्रण नाही,शिवसेना आक्रमक पवित्र्यात

राज्यासह केंद्रात सत्तेत एकत्र नांदत असलेल्या शिवसेना भाजप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमने सामने येण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेने स्वबळावर निवडणूका लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपसोबत शिवसेनेचा संघर्ष अटळ आहे. याचीच पहिली ठिणगी उद्या पडणार असल्याचे दिसत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसैनिक काळे झेंडे दाखवणार अाहेत.
Udhhav Thakre - Narendra Modi
Udhhav Thakre - Narendra Modi

मुंबई : राज्यासह केंद्रात सत्तेत एकत्र नांदत असलेल्या शिवसेना भाजप नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आमने सामने येण्याची चिन्ह दिसत आहेत. शिवसेनेने स्वबळावर निवडणूका लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपसोबत शिवसेनेचा संघर्ष अटळ आहे. याचीच पहिली ठिणगी उद्या पडणार असल्याचे दिसत असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवसैनिक काळे झेंडे दाखवणार अाहेत.

उद्या रविवार दि. 18 फेब्रवारी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची कोनशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राज शिष्टाचारानुसार स्थानिक शिवसेना खासदार राजन विचारे यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. शिवसेनेचे खासदार, मंत्री, आमदार यांनाही या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले नाही.

त्यामुळे उद्या होणाऱ्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसेना काळे झेंडे दाखवून निदर्शने देखील करणार असल्याचे शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी सांगितले आहे. कोकणात होणाऱ्या नाणार प्रकल्पावरून शिवसेना भाजपात तणावाचे संबध असताना विमानतळाच्या उद्धघाटनाच्या निमंत्रणावरून रूसवा फुगवा सुरू झाला आहे.

विमानतळाच्या श्रेयावरून भाजप शिवसेनेचा वाद विकोपाला जाणार असून राज्याच्या व केंद्राच्या सत्तेतून शिवसेना बाहेर पडणार का ? असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. भाजपने नेहमीप्रमाणे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेला दूर ठेवले असल्याची अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com