shivsena activist on ayodhya tour | Sarkarnama

3500 कार्यकर्त्यांना घेवून नितीन बानुगडे अयोध्येला जाणार

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

कार्यकर्ते येत्या 21 तारखेला प्रस्थान करणार आहेत.

सातारा : श्रीराम मंदीर मोहिमेसाठी शिवसेनेचे कार्यकर्ते अयोध्येकडे जाणार आहेत. त्यासाठी सातारा जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे.

साताऱ्यातून लक्‍झरी बसेस व रेल्वेच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्यकर्ते येत्या 21 तारखेला प्रस्थान करणार आहेत. त्यासाठी संपर्क प्रमुख आणि कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन जिल्हाप्रमुख व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. 25 नोव्हेंबरला आयोध्येत राम मंदीरासंबंधीचा कार्यक्रम होणार आहे. यापार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक नितीन बानुगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे. यावेळी जिल्हा प्रमुख हर्षद कदम, चंद्रकांत जाधव, राजेश कुंभारदरे उपस्थित होते. आतापर्यंत अयोध्येकडे जाण्यासाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार कार्यकर्त्यांची यादी तयार आहे.   

संबंधित लेख