shivsena | Sarkarnama

शिवसेनाप्रमुखांच्या भूमिकेचा उद्धवना विसर

संदीप खांडगेपाटील : सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 17 मे 2017

मुंबई : बीडीडी चाळीची पूर्नबांधनी तेथील रहिवाशीच करतील अशी भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आज युतीचे सरकार सत्तेवर असतानाही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या भूमिकेचा विसर पडला आहे अशी नाराजी बीडीडी चाळीतील रहिवाश्‍यांनी व्यक्त करीत आहेत. 
तत्कालिन युती सरकार सत्तेवर असताना बाळासाहेबांनी बीडीडी चाळीबाबत स्पष्ट भूमिका घेतली होती. 

त्यावेळी या चाळीतील रहिवाश्‍यांना ही भूमिका मान्यही होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले नारायण राणे यांनीही पुर्नबांधणीबाबत आदेशही दिले होते. बीडीडी चल रहिवाशी संघटना जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे राणे यांनीही मान्य केले होते. राणेंना कॅबिनेटच्या बैठकीत तसा निर्णय घेण्याचीही विनंती केली होती. पुढे तसा प्रस्तावही मंजूर करण्यात आला होता. 

बीडीही चाळीबाबत राणेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मात्र पुढे सहा महिन्यातच विधानसभेची निवडणूक झाली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आले. या सरकारने मात्र बीडीडी चाळीबाबत उदासिनताच दाखविल्याने काहीही होऊ शकले नाही. राज्यात आज भाजप सत्तेवर असली तरी शिवसेना सत्तेत सहभागी आहे. या सरकारने बीडीडी चाळीच्या पुर्नबांधणीविषयी कार्यवाहीस सुरूवात केली आहे. तथापि हे काम रहिवाशी संघटनांच्या माध्यमातून न होता म्हाडाच्या माध्यमातून होत आहे. "एल ऍण्ड टी' व अन्य एका प्रसिध्द बांधकाम व्यवसायिकांकडून बीडीही चाळीचे पुर्नवसन करण्यात येणार आहे. या पुर्नबांधणीविषयी चाळीतील रहीवाशांसोबत कोणताही करार राज्य सरकारकडून करण्यात आलेला नाही. सत्तेत भागीदार असणारी शिवसेना याप्रकरणी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप चाळीतील रहीवाशांकडून करण्यात येत आहे. 

बीडीडी चाळीमध्ये राहणाऱ्या मराठी माणसांचे प्रमाण हे 85 ते 90 टक्के इतके आहे. बीडीही चाळकरांनी नेहमीच शिवसेनेची पाठराखण केली. उद्या येथील भाडे न परवडल्यास गिरणी कामगारांप्रमाणे बीडीडी चाळीतील रहीवाशीही मुंबई सोडून जाण्याचा धोका आहे. मराठी माणसाला मुंबईतून बाहेर काढण्याचे हे षडयंत्र असून उध्दव ठाकरे आम्हाला वाऱ्यावर सोडत असल्याचा आरोप स्थानिक रहीवाशांकडून करण्यात येत आहे. 

संबंधित लेख