shivsena | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

दांडीबहाद्दर आमदारांना उद्धव ठाकरेंकडून तंबी

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 मे 2017

मुंबई : शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला दांडी मारणाऱ्या आणि त्याबाबत खुलासे न देणाऱ्या 27 आमदारांची आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलीच कानउघाडणी करत तंबी दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेच्या वतीने येत्या 19 मे रोजी नाशिकमध्ये जंगी शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी शिवसेना रणशिंग फुंकणार असल्याचे समजते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी रान उठवले असताना शिवसेनाही मैदानात उतरून सरकारच्या अडचणी वाढवणार आहे. 

दुष्काळग्रस्त मराठवाडा भागातील शिवसंपर्क अभियानाची सूचना देवूनही दांडी मारणाऱ्या 27 आमदारांची कानउघाडणी करण्यासाठी या आमदारांना शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांनी आज दुपारी 12.30 ला उपस्थित राहण्याचे फर्मान सोडले होते. या बैठकीत मराठवाड्यासह राज्यातील झाडून सर्व आमदार उपस्थित होते.

राज्यात सध्या सुरू असलेल्या सगळ्या परिस्थितीवर शिवसेनेची भूमिका काय राहणार याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शिवसेनेच्या आगामी शिवसंपर्क अभियानाबाबत पहिल्या टप्प्यात मराठवाड्यातील परिस्थितीचा आढावा घेण्याचे 40 आमदारांना शिवसेना पक्षप्रमुखांनी आदेश दिले होते. त्या आदेशाला पायदळी तुडवत 27 आमदारांनी शिवसंपर्क अभियानाला दांडी मारली होती. यानंतर याबाबत पक्षाकडे दांडीचे कारणही स्पष्ट न केल्याने आज उद्धव ठाकरे यांनी आमदारांना चांगलेच झापले असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कल्पनेप्रमाणे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत शिवसैनिक पोहचणार आहेत. मी कर्जमुक्त होणारच असे अभियान शिवसेने तर्फे राबवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचे काम शिवसेना हाती घेणार आहे.

येत्या 14 व 15 मे रोजी शिवसेनेचे विदर्भात संपर्क अभियान आहे. या अभियानामध्ये शिवसेनेचे स्थानिक आमदार व पदाधिकारी सहभाग घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः अकोला येथे या अभियानाद्वारे शेतकऱ्यांच्या भेटीला जाणार आहेत. या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती संकलित करून ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केली जाणार आहे. 

संबंधित लेख