shivsena | Sarkarnama

सेनेच्या रणरागिणीचा तिकीट तपासनीसाला दणका

सुचिता रहाटे
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई : शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या शिबिरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना कुठल्याही परिस्थितीला समर्थपणे तोंड देण्यास सांगितले. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या रणरागिणीने आपल्या शिवसेनेचा ठसका दाखवला. सेनेच्या तडफदार माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी रेल्वेच्या तिकीट तपासणीला आपला भगवा जलवा दाखवत टिपिकल शिवसेना स्टाईलने तिकीट तपासणीला दणका दिला. 

शिवसेनेच्या माजी नगरसेविका राजुल पटेल मध्य रेल्वेतून विरार ते चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करीत होत्या. विरार ते चर्चगेट च्या दिशेने जाणारी ट्रेन उशिराने धावत असल्यामुळे ट्रेनमध्ये भरपूर गर्दी झाली होती. 16 डब्याच्या या रेल्वेत राजुल पटेल घाईघाईने फर्स्ट क्‍लासच्या डब्यात चढल्या. त्यांच्याकडे फर्स्ट क्‍लासचे तिकीट नव्हते. परंतु घाईगर्दीत त्या फर्स्ट क्‍लासच्या डब्यात चढल्या.

मात्र त्याचवेळी तिकीट तपासणीसाठी आलेल्या अधिकाऱ्याला तसे सांगितले व आपली चूक मान्य केली, जो काही दंड आहे तो त्या भरायलाही तयार झाल्या. परंतु तिकीट अधिकाऱ्याने त्यांना ट्रेन मधून खाली उतरण्यास सांगितले परंतु शिवसेना बैठकीला जायला उशीर होत असल्याने ट्रेनमध्येच भुर्दंड घ्यावा अशी, विनवणी राजुल पटेल यांनी केली. आधीच ट्रेन उशिराने धावत होत्या त्यात त्यांना वेळेत पोहचण्याची घाई होती.

तिकीट तपासणी अधिकारी ऐकत नसल्याने त्यांनी आपला शिवसेनेचा ठसका दाखविला. राजुल पटेल आपल्या तेजतडफदार वागणुकीसाठी खूप प्रसिद्ध आहेत. मुंबई पालिकेतील ज्युनिअर इंजिनिअरच्या थोबाडीत मारल्याच्या आरोपावरून राजुल पटेल यांना पोलिसांनी अटक केली होती. हा इंजिनिअर आपले फोटो काढत होता म्हणून राजुल पटेल यांनी त्या इंजिनिअर ला जाब विचारला परंतु उलट उत्तर दिल्याने राजुल पटेल यांनी इंजिनिअरच्या कानाखाली मारली होती. 

संबंधित लेख