Shivsangram Aandolan | Sarkarnama

शिवसंग्रामने केले उठबशा आंदोलन

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 एप्रिल 2017

राज्यातील शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा प्रश्न सध्या गाजत आहे. नाफेड तूर खरेदी केंद्रावर शासनाने शनिवारपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. केंद्रावर दोन-तीन महिन्यांपासून लाखो क्विंटल तूर मोजमापाअभावी पडून असताना खरेदी बंद करून शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. 

अकोला : शेतकऱ्यांच्या तूर खरेदीच्या ज्वलंत प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उठबशा आंदोलन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. शिवसंग्रामचे विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात झालेल्या या अफलातून आंदोलनाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या तूर खरेदीचा प्रश्न सध्या गाजत आहे. नाफेड तूर खरेदी केंद्रावर शासनाने शनिवारपासून तूर खरेदी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. केंद्रावर दोन-तीन महिन्यांपासून लाखो क्विंटल तूर मोजमापाअभावी पडून असताना खरेदी बंद करून शासनाने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. 

तूर खरेदीच्या या ज्वलंत प्रश्नावर शिवसंग्राम संघटनेने भाजप सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढत हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी तुमची "मन की बात' शेतकऱ्यांनी मनावर घेत तूरीचे विक्रमी उत्पादन घेतले. ती आमची चुक मान्य करत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करित उठबशा आंदोलन केल्याचे शिवा मोहोड यांनी सांगितले. आता तुमची "मन की बात' आम्ही मनावर न घेता फक्त कानावर घेऊ, असा इशारा देत तूर खरेदी बंद केल्याच्या निषेधार्थ शिवसंग्रामचे नेते शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात आकाश शिरसाट, गोपाल देशमुख, सुनिल खेडकर, तेजराव सोळंके, अभिषेक खंडारे, गोपाल सांगुनवेढे, प्रविण चतरकर, अन्नासाहेब पवार, अभिजीत ढोरे आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठबशा आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

संबंधित लेख