shivjayanti and sambhajiraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

कर्नाटक: कुमारस्वामी यांच्या शपथविधीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार

दानवेंच्या आग्रहास्तव छत्रपती संभाजी राजेंनी भोकरदनमध्ये साजरी केली शिवजयंती

तुषार पाटील
सोमवार, 5 मार्च 2018

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेने या वादात न पडता शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमध्ये रविवारी (ता. 4) शिवजयंती साजरी केली. तालुक्‍यातील जळगाव सपकाळ येथील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी संभाजी राजे आले होते. 

भोकरदन : छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीनुसार साजरी करायची की तारखेने या वादात न पडता शिवाजी महाराजांच्या घराण्याचे वंशज छत्रपती खासदार संभाजी राजे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या भोकरदनमध्ये रविवारी (ता. 4) शिवजयंती साजरी केली. तालुक्‍यातील जळगाव सपकाळ येथील शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी संभाजी राजे आले होते. 

देशात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरी होत आहे. दिल्लीत राष्ट्रपतीच्या उपस्थितीत शिवजंयती साजरी झाली, प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात प्रथमच शिवराज्यभिषेक सोहळा दाखवणारा रथ सहभागी झाला आणि या देखाव्याने प्रथम क्रमांक पटकावला याचा उल्लेख संभाजी राजे यांनी आपल्या भाषणात केला. त्यामुळे शिवाजी महारांजाच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मला बोलावले तेव्हा मी क्षणाचाही विलंब न लावता आलो असे त्यांनी सांगितले. 

खासदार संभाजी राजे व दानवे यांचे आमदार पुत्र संतोष दानवे यांची चांगली मैत्री असल्याचा उलगडा देखील या निमित्ताने झाला. संतोष दानवे यांच्या भोकरदन-जाफ्राबाद मतदारसंघातील जळगाव सपकाळ येथे शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ भव्य असा पुतळा उभारण्यात आला आहे. शिवजयंतीच्या मुहुर्तावर या पुतळ्याचे अनावरण त्यांच्याच घराण्याचे वंशज संभाजी राजे यांच्या हस्ते करण्याचे संतोष दानवे यांनी ठरवले होते. 

खासदार रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांनी संभाजी राजेंना येण्याचा आग्रह केला आणि संतोष दानवे यांच्याशी असलेल्या मैत्रीपोटी राजेंनी अलिबाग येथील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करत भोकरदन गाठले. दानवे-पिता पुत्रांनी याचा भाषणात आर्वजून उल्लेख केला. 

संतोष दानवे आणि संभाजी राजे यांची मुंबई-दिल्लीत अनेकवेळा भेट होत असते. दिल्लीत असले तरी संतोष दानवे माझ्या बंगल्यावर कमी आणि संभाजी राजे यांच्या निवासस्थानीच अधिक काळ असतात असे सांगत रावसाहेब दानवे यांनी राजे आणि संतोष यांच्यातील मैत्रीचा धागा किती घट्ट आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आपल्या भाषणातून केला. शिवाय आपले राजकीय गुरू माजी आमदार स्व. विठ्ठल अण्णा सपकाळ यांच्या आठवणींना उजाळा दिला. 

रावसाहेब यांच्या प्रमाणेच संतोष दानवे यांनी देखील छत्रपती संभाजी राजे यांच्याबद्दल आदर व्यक्त करत राजांचा स्वभाव साधा असल्याचे सांगितले. सर्वसामान्यांना ते नेहमी वेळ देतात त्यामुळे मोदी सरकारने देखील राष्ट्रपतींच्या कोट्यातून राजेंना सन्मानाने राज्यसभेवर पाठवत त्यांचा मान राखल्याचे सांगितले. 

आधी रामदेव बाबा आता राजे 
गेल्या महिन्यात जालना आणि भोकरदन येथे योगगुरू रामदेव बाबा यांच्या उपस्थितीत रावसाहेब दानवे यांनी योग शिबीर व शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावरून जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर शिवजयंतीच्या मुहूर्तावरच महाराजांच्या घराण्याचे वंशज छत्रपती संभाजी राजे यांना मतदारसंघात पाचारण केल्यामुळे दानवे-पिता पुत्रांच्या आगामी निवडणूकीची तयारी म्हणूनच याकडे पाहिले जात आहे. 

संबंधित लेख