आली रे आली...उदयनराजे तुमची वेळ आली!

पायऱ्या चढताना, उतरताना कोणाच्या कमरेवरची पॅन्ट खाली घसरते आणि कोणाचा तोल सुटतो, हे सातारकांना माहिती आहे.
आली रे आली...उदयनराजे तुमची वेळ आली!

सातारा : उदयनराजे मला माझी पायरी ठाऊक आहे. कोणाला कोणत्या पायरीवर ठेवायचे हे सातारकर ठरवतील पण, पायऱ्या चढताना, उतरताना कोणाच्या कमरेवरची पॅन्ट खाली घसरते आणि कोणाचा तोल सुटतो, हे सातारकांना माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायऱ्या मोजा. बाप्पांचे विसर्जन मंगळवार तळ्यात होऊ शकले नाही पण तुमच्या विसर्जनाची वेळ आता आली आहे. जनताच लवकरच तुमचे विसर्जन करेल, असा इशारा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना दिला. 

साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी दिलेल्या उत्तरला प्रत्युत्तर देताना शिवेंद्रसिंहराजे त्यांच्यावर टिकेची झोड उठविली. त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले की, मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा हे तुम्हालाच माहित. पत्रावर सही करताना तुम्ही झोपेत होता का तंद्रीत, तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भिंतीला धरुन उभे होता. 2015 मध्ये पाणीटंचाई असल्याचे सांगून सातारकरांना भुलवू नका. विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण करुन नागरिकांना, गणेश मंडळांना आणि जिल्हा प्रशासनाला वेठीस धरुन तुम्ही काय मिळवले? थापेबाजी आणि डायलॉगबाजी करुन प्रश्‍न सुटत नसतात, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. सातारा पालिकेनेच तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नसून पालिकेने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केल्याने तुमचे नाकच कापले गेले. 40 वर्षात काय केल, संस्था बुडवल्या, भ्रष्टाचार केला, या तुणतुण्या शिवाय तुमच्याकडे बोलायला काहीच नाही.

आमच्या संस्थांची काळजी तुम्ही करु नका. यासाठी मी आणि सभासद समर्थ आहोत. अजिंक्‍यतारा कारखान्याच्या प्रदूषणाचेही प्रद्रूषण मंडळ पाहून घेईल. तुम्ही गेल्या 10 वर्षात काय दिवे लावले? हा प्रश्‍न विचारणे म्हणजे गाढवापुढे गीता वाचण्यासारखे ठरेल. तुम्ही सातारा मतदारसंघाचे खासदार आहात का सातारा शहराचे, हाच प्रश्‍न आता तमाम जनतेला पडला आहे. स्वत: काही करायचे नाही. दुसऱ्यांनी चांगले केले तर, तुम्हाला बघवणार नाही. माझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण, विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करु नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही आणि उगवली तर, राहिल का नाही अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे, असेही शेवटी शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com