shivendraraje at everest base camp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

शिवेंद्रसिंहराजे- वेदांतिकाराजे पोचले एव्हरेस्ट बेस कॅम्पवर 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सातारा: साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांच्यासमवेत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचले आहेत. येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.  

सातारा: साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांच्यासमवेत एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोहोचले आहेत. येथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासही अभिवादन केले.  

15 दिवसांपूर्वी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, पत्नी वेदांतिकाराजे भोसले व बंधू विक्रमसिंहराजे भोसले हे त्यांच्या साथीदारांसह एव्हरेस्ट बेस कॅम्पकडे प्रस्थान केले होते. घटस्थापनेच्या मुहूर्तावरच या दाम्पत्याने एव्हरेस्टचा बेस कॅम्पपर्यंत चढाई केली आहे. या कॅम्पवर पोहोचण्यासाठी त्यांनी काठमांडुवरून नेपाळमधील सर्वात उंच असलेल्या लुकला विमानतळावर उतरून या अत्यंत अवघड ट्रेकची सुरवात केली होती. त्यांच्या समवेत विक्रमसिंहराजेंसह ऑस्ट्रेलियातील काही मित्रही सहभागी झाले होते. हा बेस कॅम्प समुद्र सपाटीपासून पाच हजार 364 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अनेक अडथळ्यांशी दोन हात करावे लागतात. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंनी यापूर्वी सर्व तयारी केली होती. त्यामुळे त्यांना ही चढाई सहज शक्‍य झाली. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर सहपत्निक पोहोचणारे ते पहिले आमदार ठरले आहेत. 

संबंधित लेख