shivendraraje bhosale about balu khandare | Sarkarnama

मी बाळूला काही सांगून पाठवले नव्हते: शिवेंद्रसिंहराजे 

उमेश बांबरे
शनिवार, 1 डिसेंबर 2018

सातारा : 'मनोमिलन, एकत्र येणे हा कुठेच विषय नाही. नगरसेवक बाळू खंदारे जे बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. नगरविकास आघाडीचा त्याच्या मताशी कोणताही संबंध नाही', असे स्पष्टीकरण साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिले. 

सातारा : 'मनोमिलन, एकत्र येणे हा कुठेच विषय नाही. नगरसेवक बाळू खंदारे जे बोलले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. नगरविकास आघाडीचा त्याच्या मताशी कोणताही संबंध नाही', असे स्पष्टीकरण साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिले. 

शिवेंद्रसिंहराजेंच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक बाळू खंदारे यांनी काल पालिकेच्या सर्वसाधारण सभेत साताऱ्यातील दोन्ही महाराजांना सातारा व नगरविकास आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र आणावे, असे वक्तव्य करून दोन्ही महाराजांच्या मनोमिलनाची मागणी केली होती.

आज शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोण कुठे भाषण करत असेल तर त्याचा राजकिय विषय होत नाही. त्यांनी भाषण केले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. मी त्याला काही सांगून पाठविले नव्हते. मी काल मुंबईत होतो. त्यामुळे पालिका सभेत तो नेमके काय बोलला, हे माहित नाही. मनोमिलनाबाबत काहीही चर्चा नाही. 

मी विधानसभेला उभा राहणार आहे. मला निवडुन यायचे आहे. त्या पध्दतीने माझे काम सुरू आहे. त्यामुळे कोण कोण माझ्या विरोधात असणार आहे, हे माहित आहे. त्यानुसार मी माझी तयारी करत आहे. मनोमिलनाला विरोध आहे, म्हणण्यापेक्षा चर्चाच झालेली नाही. साताऱ्यात ज्यांना काही कामधंदे नाहीत, महाराजांच्या चर्चा केल्यावरच त्यांचे चालते, असे बरेच आहेत. त्यांचीच बसल्या बसल्या चर्चा असते. झाले मनोमिलन, नाही झाले असे बडबडणारी लोक असतात. मनोमिलनावर कोणात्याही पातळीवर चर्चा नाही. खासदारांचे त्यांच्यापातळीवर काम सुरू आहे. माझे माझ्यापातळीवर काम सुरू आहे. कुठेही हा विषय नाही. बाळू खंदारे बोलला हे त्याचे वैयक्तिक मत आहे. मनोमिलनाचा माझ्यापुढे विषयच नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.  

संबंधित लेख