shivendraraje about maratha reservation talk | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांनी राजकारण्यांशी चर्चा करु नये : शिवेंद्रसिंहराजे 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

सातारा : मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी राजकिय पार्श्‍वभूमी असलेल्या व्यक्तींना टाळून मराठा समाजातील जबाबदार व्यक्तींशीच चर्चा करावी व त्यातून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली. 

राजकिय पार्श्‍वभूमी असलेल्यांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यापेक्षा मराठा समाजातील जबाबदार व या विषयाचे ज्ञान असलेल्यांशी चर्चा करायला हवी, अशी अपेक्षा व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मुळात राजकिय व्यक्तींची प्रत्येकाची एक महत्वाकांक्षा असते. त्यातून याविषयात वेगळेपण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकिय व्यक्तींना टाळून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजातील तज्ज्ञांशीच चर्चा करावी. यातून मराठा समाजाला अपेक्षित यश मिळेल. अन्यथा चर्चेला गेलेल्या राजकिय व्यक्तीकडून राजकारणच होण्याची भीती आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख