shivani wadettiwar enters in politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

विजय वडेट्टीवारांची कन्या शिवानी राजकारणात 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 सप्टेंबर 2018

चंद्रपूर युवक कॉंग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली आहे. 

चंद्रपूर : विधानसभेतील कॉंग्रेसचे उपनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राजकारणात पाऊल टाकले आहे. चंद्रपूर युवक कॉंग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली आहे. 

चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी मात्र अत्यंत सामान्य घरातील कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसलेला हरीश कोतावर निवडून आला आहे.चंद्रपूर जिल्हा युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीचा निकाल आज घोषित करण्यात आला. शिवानी वडेट्टीवार वगळता या निवडणुकीत कोणत्याही नेत्याला मुलामुलींना स्थान मिळाले नाही. ग्रामीण भागात कॉंग्रेस पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या युवक कार्यकर्त्यांनी बाजी मारली आहे.  

संबंधित लेख