shivajirav patil | Sarkarnama

आजचा वाढदिवस : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 8 मे 2017

लांडेवाडी (ता. आंबेगाव ) जि. पुणे येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म. उदरनिर्वाहासाठी त्यांनी पेपरची लाईन टाकणे, शिपाई अशी कामे केली होती. विधानसभेचे माजी अध्यक्ष व आमदार श्री. दिलीप वळसे पाटील यांच्यामुळे ते राजकारणात सक्रीय. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. त्यानंतर 2004 पासून ते आतापर्यंत ते शिवसेनेकडून खेड तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघात खासदार म्हणून बहुमताने निवडून आले. जनसामान्यात जवळचा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. बैलगाडा शर्यतीस त्यांनी प्रोत्साहन दिले. संसदेत जास्त प्रश्‍न विचारणाऱ्या खासदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. डायनालॉग या संगणकाशी निगडीत असलेल्या कंपनीची स्थापना केली. तिचा विस्तार बाहेरील देशातही केला. त्यांनी भैरवनाथ पतसंस्था, शिवाजीराव पाटील विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल (लांडेवाडी) स्थापना केली आहे. 

संबंधित लेख