shivaji vanvashaj govn appeal for maratha reservation | Sarkarnama

उदयनराजे, संभाजीराजेंना पुढाकार घेण्याचे आवाहन 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 जुलै 2018

मुंबई ः देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार मराठा समाजासाठी आवश्‍यक ती सर्व पावले उचलण्यास तयार आहे, समाजाने त्यांचा आक्रोश रस्त्यावर व्यक्‍त न करता चर्चेसाठी यावे हे आवाहन समाजातील मान्यवरांनी करावे असे प्रयत्न सुरू होणार आहेत. मराठा समाजातील विचारवंत, लेखक , समाजसेवक यांच्याशी या निमित्ताने संवाद साधला जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनीही यात पुढाकार घ्यावा असे आवाहन करण्यात येणार आहे. 

साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे राज्यसभा सदस्य युवराज संभाजीराजे तसेच विक्रमसिंह घाटगे यांचे सुपुत्र समरजितसिंहराजे यांनी पुढाकार घेवून समाजबांधवांना चर्चेसाठी एकत्र आणावे असा प्रस्ताव आहे. महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूर या दोन गाद्या छत्रपतींचा महिमा पुढे नेतात, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहूमहाराज हे मराठा समाजाला आदरणीय आहेत. 

आज रस्त्यावर उतरलेल्या आणि अस्वस्थ झालेल्या या समाजाला शांत करण्याचे आवाहन या मंडळींनी केले तर त्याचा वातावरण शांत होण्यासाठी उपयोग होईल अशी सरकारमधील काही महत्वाच्या मंडळींची भूमिका आहे. 

मराठा आरक्षणाच्या विषयावर छत्रपती उदयनराजे यांची मदत घेण्याचे आवाहन परिषद सदस्य आणि माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी केले आहे. 

संबंधित लेख