shivaji kardile's daughter wins corporator election | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

शिवाजी कर्डिलेंच्या दोन्ही मुली राष्ट्रवादीकडून विजयी

मुरलीधर कराळे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

कर्डिले यांनी मुलीच्या विजयासाठी केलेली मदत जगजाहीर झाली.

नगर : भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या दोन्ही मुली नगर महापालिकेच्या निवडणुकीत विजयी झाल्या. त्यामुळे कर्डिले यांच्या राजकारणाची जादू पुन्हा एकदा नगरकरांनी अनुभवली.

आमदार कर्डिले यांची मुलगी शीतल संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीकडून प्रभाग १४ मधून उमेदवारी केली. त्यांना भाजपच्या संगीता गांधी, शिवसेनेच्या सुरेखा भोसले यांचे आव्हान होते. मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी असलेल्या शीतल याचा प्रभाग हा आमदारांना मानणारा असल्याने अपेक्षाप्रमाणे तेथे शीतल जगताप यांचा विजय झाला. 

आमदार कर्डिले यांची दुसरी मुलगी ज्योती गाडे यांनी प्रभाग क्रमांक चारमधून राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. त्यांना शिवसेनेच्या कमल दरेकर, भाजपच्या वंदना कुसळकर यांनी आव्हान दिले होते. शिवसेनेच्या भाऊ कोरेगावकर यांनी प्रचाराच्या दरम्यान भाषणात कर्डिले यांना आव्हान करीत भाजपच्या उमेदवाराला निवडून दिल्यास मी पदाचा राजीनामा देईल, असे म्हटले होते. म्हणजेच कर्डिले यांनी मुलीच्या विजयासाठी केलेली मदत जगजाहीर झाली.

महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत आमदार कर्डिले हे किंगमेकर ठरले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच केडगाव येथील काँग्रेसचे सर्व उमेदवार एका रात्रीतून पळवून भाजपमध्ये दाखल केले होते. ही त्यांची राजकारणाची जादू भाजपलाही तारेल, असा लोकांचा भ्रम राहिला. भाजपला तारण्याऐवजी त्यांच्या दोन्ही मुली व जावई असलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना सोयीच्या राजकारणाकडे ही जादू परिवर्तीत झाली.
 

संबंधित लेख