shivaji kardile play key role in kedgaon politics | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

पहाटे चारला केडगावच्या कोतकरांचा निर्णय झाला!

​मुरलीधर कराळे 
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

एकाच दगडात दोन नव्हे, तर चार पक्षी मारल्याचे मानले जाते.   

नगर: मातब्बर राजकारणी म्हणून भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांची ख्याती आहे. आज केडगावमध्ये राजकीय भुकंप करीत त्यांनी एकाच दगडात दोन नव्हे, तर चार पक्षी मारल्याचे मानले जाते.   

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या केडगाव येथे आज राजकीय भूकंप झाला. कोणालाही अपेक्षित नसलेली घटना घडली. केडगावमधील महापालिकेसाठी गुडघ्याला बाशिंग बांधुन असलेले काँग्रेसच्या उमेदवारांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. ही किमया घडविणारा किमयागार कोण, हे उघड होण्याआधीच लोकांनी समजून घेतले आहे. अशी किमया केवळ आमदार शिवाजी कर्डिलेच घडवू शकतात, यात कोणालाही शंका वाटत नाही.

केडगावमध्ये कोतकर कुटुंबियांनी नुकतीच एक बैठक घेवून आपण सर्वजण एका झेंड्याखाली यावे, असे ठरले. काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने या दोन्ही प्रभागांत भाजपलाच उमेदवार मिळेल की नाही, अशी शंका होती, मात्र एकाच रात्रीत सर्व उलटे झाले. कालच्या रात्री मोठ्या घडामोडी घडल्या. पहाटे चार वाजता फोन खणाणले. निश्चय झाला. सर्वजण एका नेतृत्त्वाच्या सांगण्यावरून एकत्र आले. आणि आज महापालिकेच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सायंकाळी शेवटच्या क्षणी पक्षाचा एबी फार्म बदलले. सर्वांनाच भाजपकडून एबी फॉर्म मिळाले आणि राजकीय भुकंप झाला. 

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा उमेदवारच राहिला नाही. त्यानंतर उशिरा सर्वांचा भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला. ही नाट्यमय घडामोड कोण घडवू शकते? कोतकर यांच्या बालेकिल्ल्यात नवख्या नेत्याची घुसण्याची हिंमत तर होणारच नाही. शिवाय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी असल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचे नामोहरन करण्यास कोण पुढे येणाराही तितकाच जवळचा असेल, यात शंका नव्हती. ही किमया घडविली कोणी, याबाबतचे संकेत भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे जातात.
 
काँग्रेसचे सर्वच उमेदवार एका हाकेसरशी भाजपमय होणार नाहीत, ही काळ्या दगडावरची रेष. त्यांच्या नेत्यांच्या सांगितल्याशिवाय हे अश्यक्यप्राय आहे. महापालिकेची जबाबदारी सुजय विखे पाटील यांच्याकडे आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसच्या जागा वाटपात राष्ट्रवादीने ४० जागा घेतल्या, काँग्रेस केवळ २२ जागांवर स्थिर राहिले. याच वेळी मातब्बरांच्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी काळेबेरे असल्याचे समजून आले. आगामी काळात असे काहीतरी घडणार होते, हे काँग्रेसच्या काही नेत्यांनाही माहिती होते का, याबाबत शंका उपस्थित होत आहेत. विखे पाटील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा गड जिंकायला निघाले असताना हे अपयश ते नक्कीच पचविणार नाहीत, यात शंका नाही. हे सर्व आधीच ठरवून झाले का, अशी शंका उपस्थित होते आहे. 

 

संबंधित लेख